शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील विभाग प्रमुखांना आता ‘केआरए’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:52 IST

महापालिकेतील विभाग प्रमुखांना आता ‘केआरए’ (की रिझल्ट एरिया) लागू करण्यात आला आहे. वर्षभराच्या कामाचे नियोजन सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिले आहे. ‘केआरए’मुळे सर्वांच्या कामाची दिशा एकच राहते आणि कामासाठी घेतलेले परिश्रम वाया जात नाहीत, असे आयुक्तांनी सांगितले.

औरंगाबाद : महापालिकेतील विभाग प्रमुखांना आता ‘केआरए’ (की रिझल्ट एरिया) लागू करण्यात आला आहे. वर्षभराच्या कामाचे नियोजन सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिले आहे. ‘केआरए’मुळे सर्वांच्या कामाची दिशा एकच राहते आणि कामासाठी घेतलेले परिश्रम वाया जात नाहीत, असे आयुक्तांनी सांगितले.डॉ. निपुण विनायक यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या नावाने पत्र काढले आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आपण आपल्या विभागाचे काम करताना काही ठराविक निकष समोर ठेवल्यास कामाला एक दिशा मिळते आणि केलेल्या कामाचा फायदा होतो. आपल्या विभागाशी संबंधित असे निकष काय असावेत याबाबत वेळोवेळी चर्चा केली आहे. त्याचे संकलन केलेली यादी या पत्रासोबत दिली आहे. पुढील एक वर्षात कामे करताना ‘केआरए’ हे मार्गदर्शक समजून आपण काम करावे. ‘केआरए’ साध्य करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावेत, ‘केआरए’ आपल्या कार्यमूल्यांकनासाठीदेखील उपयुक्त ठरेल.आपण आपल्या कामाचे नियोजन ‘केआरए’प्रमाणे करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा. कार्यवाहीचा प्रगती अहवाल दर शनिवारी सादर केल्यास मी आपला आभारी राहील. ‘केआरए’ आपण लॅमिनेट करून आपल्या टेबलवर किंवा कक्षात दर्शनी भागात लावल्यास उद्दिष्टपूर्तीसाठी तो उपयोगी ठरू शकेल.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEmployeeकर्मचारी