शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदाही प्रेमात अपयश आल्याने ‘व्हॅलेंटाइन डे’लाच त्याने संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:56 IST

शिवशंकर कॉलनीत पेट्रोल ओतून जाळून आत्महत्या करणारा तरुण सिल्लोडचा

ठळक मुद्देहातावरील पहिल्या प्रेयसीच्या नावाच्या टॅटूमुळे पटली ओळख 

औरंगाबाद : शिवशंकर कॉलनीत ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या (दि.१४ फेब्रुवारी) मध्यरात्री पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्महत्या करणाऱ्या अनोळखी तरुणाची ओळख त्याच्या हातावरील टॅटूमुळे पटली.आकाश दिलीप इंगळे (२२, रा. सिल्लोड), असे त्याचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्याच्या कथित प्रेयसीचे नावही पोलिसांना प्राप्त झाले.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आकाश हा आई-वडिलांसोबत सिल्लोड येथे राहतो. तो बी.एस्सी. प्रथम वर्षात शिकत होता. त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक, तर आई गृहिणी आहे. त्याला तीन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. आकाश लाडात वाढल्यामुळे तो मनासारखे जगत होता. त्याचे सिल्लोड येथील एका मुलीवर प्रथम प्रेम होते. त्याने तिचे अश्विनी नाव स्वतःच्या हातावर गोंदून घेतले होते. काहीतरी कारणामुळे त्याचा प्रेमभंग झाला. पहिलीसोबत ताटातूट झाल्यावर त्याचे औरंगाबाद शहरातील एका तरुणीसोबत प्रेम जुळले. त्याने आणि त्याच्या मित्राने एका हातावर स्वतःचे नाव आणि दुसऱ्या हातावर दिल आणि ईसीजीचा टॅटू काढला होता. त्याचे आजोबा (वडिलांचे वडील ) मुकुंदवाडीतील शिवाजीनगरात राहतात. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या आदल्या दिवशी तो आणि त्याची आई आजोबाकडे आले होते. ‘व्हॅलेंटाइन डे’ला तिला भेटायचे त्याने ठरविले होते. आकाशची प्रेयसीसोबत काहीतरी कारणावरून कुरबूर झाली होती. तो तिला भेटण्यासाठी शिवशंकर कॉलनीत गेला. मात्र, ती त्याला भेटली नाही. यामुळे नैराश्येतून त्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर आली.

‘लोकमत’ वाचून आकाशच्या बहिणीने केला पोलिसांना फोनआकाश १४ जानेवारी रोजी सायंकाळी आजोबाच्या घरून बाहेर पडला तेव्हा त्याने त्याचा अँड्राॅइड फोन घरीच ठेवला होता. यामुळे त्याच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. मंगळवारी सकाळी ‘लोकमत’मध्ये या घटनेचे वृत्त प्रकाशित झाले. यातील मृताचे वर्णन वाचून आकाशच्या बहिणीने पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तायडे यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांना मृताच्या हातावरील टॅटू दाखविला आणि अंगावरील कपडे आणि चप्पल दाखविल्यावर तिने हंबरडा फोडला. वडिलांनीही आकाश त्यांचीच चप्पल वापरत असल्याचे सांगून अश्रूला वाट मोकळी करून दिली.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी