भावसिंगपुरा परिसरातील नेहरूनगर येथील नागसेन दयाराम तायडे हे समुद्रपूर (जि. वर्धा) येथील तहसील कार्यालयात कार्यरत आहे. ते कामानिमित्त समुद्रपूर येथे गेले होते, तर त्यांचा भाऊ नागसेन हे २३ जानेवारीला दुपारी तीन वाजता ते कामानिमित्ताने सासुरवाडी असलेल्या पुसद (जि. यवतमाळ) येथे गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ३० जानेवारीला सायंकाळी तक्रारदार हेमंत हे औरंगाबादला परतले. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घराचे कुलूप तुटलेले आणि दार उघडे असल्याचे त्यांना दिसले. याविषयी त्यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी पंचनामा करून चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला. सहाय्यक फौजदार साबळे तपास करीत आहेत.
भावसिंगपुऱ्यातील घर फोडून तीन तोळ्यांचे मंगळसूत्र पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST