शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही पोस्टातील योजनेत गुंतवणूक केली काय? विमा गुंतवणुकीस नागरिकांची गर्दी वाढली

By साहेबराव हिवराळे | Updated: February 8, 2024 19:12 IST

बँकांच्या विविध मुदत ठेव योजना, एलआयसी आणि म्युच्युअल फंड एसआयपी यासारख्या गुंतवणूक पर्यायांना गुंतवणूकदार पसंती देतात.

छत्रपती संभाजीनगर : गुंतवणुकीच्या दृष्टीतून पाहिले तर अनेक योजना असून यामध्ये बरेच जण गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतात. गुंतवणूक करताना कोणताही गुंतवणूकदार हा सर्वप्रथम गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या गोष्टींना प्राधान्य देतो. पोस्टाच्या ३९९ रुपयांच्या अपघात पाॅलिसीमध्ये १० लाखांची सुरक्षा तुम्हाला मिळते. उपचारासाठी ६० हजार, प्रवासभाडे ३० हजार योजनेतून मिळते.

बँकांच्या विविध मुदत ठेव योजना, एलआयसी आणि म्युच्युअल फंड एसआयपी यासारख्या गुंतवणूक पर्यायांना गुंतवणूकदार पसंती देतात. या खालोखाल पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांना गुंतवणूकदारांकडून पसंती दिली जात आहे.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनापोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना ही एक प्रकारची डिपॉझिट योजना असून यामध्ये जर तुम्ही पाच वर्षांकरिता पैसे जमा केले तर या माध्यमातून चांगल्या पद्धतीने तुम्हाला व्याज मिळू शकते. सध्या या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर ७.७ टक्के दराने व्याज दिले जात आहे.

अल्पवयीन मुलांच्या नावावर गुंतवणूक होते..या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. यामध्ये कोणत्याही नागरिकाला खाते उघडता येते व या योजनेत संयुक्त खात्याचीदेखील सुविधा देण्यात आलेली आहे. पालक अल्पवयीन मुलांच्या नावावर गुंतवणूक करू शकतात व दहा वर्षांपर्यंतची मुले स्वतःच्या नावावर या योजनेत खाते सुरू करू शकतात.

या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्येजास्त कालावधीकरिता पैसे जमा करणे गरजेचे नसते. कारण या योजनेचा परिपक्वता कालावधी पाच वर्षांचा आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याजाचा लाभ देण्यात येतो आणि त्यासोबतच हमी परतावादेखील उपलब्ध आहे. कालावधीमध्ये व्याजदर कमी झाला किंवा वाढला तरी तुमच्या खात्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

भक्कम मिळतो परतावा?या योजनेमध्ये दहा लाख रुपये गुंतवले तर व्याजापोटी ४ लाख ४९ हजार ३४ रुपये मिळतात व पाच वर्षांनंतर तुम्ही एकूण तुम्ही गुंतवलेले १० लाख आणि व्याजापोटी मिळणारे ४ लाख ४९ हजार ३४ रुपये मिळून तुम्हाला १४ लाख ४९ हजार३४ रुपये मिळतात. १० लाख गुंतवणुकीतून तुम्ही पाच वर्षांत साधारणपणे साडेचार लाख रुपये या योजनेतून मिळवू शकता.- संजय पाटील, पोस्ट मास्टर

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसAurangabadऔरंगाबाद