शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा असूद्या, अंधश्रद्धा नको; ‘नागोबाला’दुध पाजू नका, हळदी-कुंकूवाने सापाचा होऊ शकतो मृत्यू

By साहेबराव हिवराळे | Updated: August 2, 2022 11:51 IST

कुणी नागोबाचा खेळ करण्याचा किंवा त्याच्यावर पैसे कमविण्याचा प्रयत्न केल्यास तो दंडास आणि गुन्ह्यास पात्र ठरणार आहे.

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : नागपंचमीदिवशी नागोबाच्या प्रतिकात्मक चित्राची पूजा केली जाते. तसेच वारूळावर जाऊन दूध, लाह्या हळदी-कुंकू वाहिल्या जातात; परंतु कुणीही नाग, सापाचा खेळ केला किंवा त्यावर पैसे कमाविण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी वन विभागाची पथके तैनात आहेत.

शहरात वारूळ दिसत नाहीत. त्यामुळे नागोबाची प्रतिकृती असलेल्या फोटोची पूजा केली जाते. नागोबा घेऊन खेळ मांडणाऱ्यांवर वन विभागाचे पथक लक्ष ठेवणार आहे. कुणी नागोबाचा खेळ करण्याचा किंवा त्याच्यावर पैसे कमविण्याचा प्रयत्न केल्यास तो दंडास आणि गुन्ह्यास पात्र ठरणार आहे. वन विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पथके नियुक्त केली आहेत, असे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांनी सांगितले.

घ्या खबरदारी उपचारअंधश्रद्धेतून पूजा करू नका, सापाला हाताळू नका, अघोरी बाबा, बुवांकडून उपचार न करता साप व नाग चावल्यानंतर सर्वांत पहिले प्रथमोपचार घ्यावा. प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे, असे वन्यजीवप्रेमी मनोज गायकवाड यांनी सांगितले.

तो शेतकऱ्यांचा खरा मित्रच...साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र मानला जातो. तो पर्यावरण समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. नागपंचमीला शेतात नांगरदेखील चालवित नाहीत. साप एखादी व्यक्ती अथवा घटना लक्षात ठेवू शकत नाही. साप बदला घेत नाही.

साप दूध पितो का?साप हा सस्तन प्राणी नाही. दूध हे सस्तन प्राण्यांचे अन्न आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचे नाही.

सापाच्या अंगावर केस असतात का?साप हा सस्तन प्राणी नाही, सस्तन प्राण्यांच्याच अंगावर केस असतात.

हळदी-कुंक त्याच्या शरीरासाठी अपायकारक असून, त्वचा खराब होऊन त्याचा मृत्यू होतो. - डॉ. नरेंद्र सुतार, सेवानिवृत्त हाप्कीन्स)

सापाबद्दल या सर्व अंधश्रद्धा अशा...- सापाच्या डोक्यावर मणी असतो- सापाला केस असतात- साप धनाचे रक्षण करतो- साप पाठलाग करतो- साप पुंगीवर नाचतो- साप बदला घेतो- साप दूध पितो- विशिष्ट प्रकारच्या सापांमुळे धनलाभ होतो.

टॅग्स :snakeसापNag PanchamiनागपंचमीAurangabadऔरंगाबाद