शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

हर्सूलमधील रस्ता अखेर रुंदावणार; मालमत्ताधारकांनी भूसंपादनास दर्शवली सहमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:25 IST

हर्सूल गावातील रस्ता रुंद करण्याचा प्रश्न मागील दहा वर्षांपासून रखडला होता. मंगळवारी महापालिका, सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी १२२ मालमत्ताधारकांसोबत बैठक घेतली. बैठकीत सर्व मालमत्ताधारकांनी भूसंपादनास सहमती दर्शविली आहे.

औरंगाबाद : हर्सूल गावातील रस्ता रुंद करण्याचा प्रश्न मागील दहा वर्षांपासून रखडला होता. मंगळवारी महापालिका, सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी १२२ मालमत्ताधारकांसोबत बैठक घेतली. बैठकीत सर्व मालमत्ताधारकांनी भूसंपादनास सहमती दर्शविली आहे. रेडीरेकनर दरानुसार भूसंपादन करण्यास आमची कोणतीच हरकत नसल्याचे मालमत्ताधारकांचे म्हणणे आहे. त्यामुळे लवकरच अरुंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

हर्सूल गावातील हनुमान मंदिरात उपमहापौर विजय औताडे यांच्या पुढाकाराने मालमत्ताधारकांची बैठक सकाळी ९ वाजता आयोजित केली होती. रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंनी किमान ४५ फूट भूसंपादन करावे लागेल, असे राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. हा रस्ता ९० फुटांचा असेल. मध्यभागी ५ फूट दुभाजक, प्रत्येकी ३५ फुटांचा रस्ता (एकूण ७० फुटांचा रस्ता) त्यानंतर प्रत्येकी ५ फुटांचा फुटपाथ, असा रस्ता असणार असल्याचे सांगण्यात आले. रस्ता मोठा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा होती. रस्त्याच्या दर्शनी भागातील दुकाने कशी वाचविता येतील यादृष्टीने काही मालमत्ताधारकांनी आपले म्हणणे मांडले.

रस्ता ७० फूट केला, तर दुकाने वाचू शकतील असा दावाही मालमत्ताधारकांनी केला. रस्त्याच्या पाठीमागे लपलेल्या मालमत्ताधारकांनीही आपला आवाज बुलंद केला. ३५ ते ५० फूट रस्ता रुंद करा, असे त्यांचे म्हणणे होते. कारण समोरील मालमत्ता गायब झाल्यावर आपले घर समोर येईल, यादृष्टीनेही बैठकीत काही जणांचा आटापिटा सुरू होता. सार्वजनिक बांधकामाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता जोशी, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता घुगे यांची उपस्थिती होती.

दुसरी बैठक महापालिकेतरस्ता रुंदीकरणासंदर्भात ही प्राथमिक बैठक होती. पुढील आठवड्यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर आणि राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत मालमत्ताधारकांना देण्यात येणार्‍या मोबदल्याचे स्वरूप स्पष्ट होईल. 

निधी भरपूर उपलब्धराष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध आहे. त्यामुळे मोबदल्यापोटी शासकीय दराच्या दुप्पट निधी मागितला तरी तो देण्याची तयारी आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका