शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा विभागाचे २१.५९ कोटी लंपास करणारा हर्षकुमार सहा दिवसांपासून पसारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:30 IST

साताऱ्यात वडिलांच्या नावेदेखील फ्लॅट, एका फ्लॅटमध्ये भरपूर दागिने, रोकड; चौकशीच्या ससेमिरा लागण्याच्या भीतीने क्रीडा विभागाचे धाबे दणाणले

छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडासंकुलात कोट्यवधींचा घोटाळा करून पसार झालेला हर्षकुमार क्षीरसागर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दुसरीकडे, तपास पथक त्याच्या संपत्तीची चौकशी करत असून साताऱ्यात विकत घेतलेल्या फ्लॅटपैकी एक फ्लॅट वडिलांच्या नावे घेतला आहे. घोटाळ्यातील रकमेतून जीवन कार्यप्पा विंदडानेदेखील एक फ्लॅट खरेदी केला आहे.

शनिवारी रात्री विभागीय क्रीडासंकुलाच्या घोटाळ्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर क्षीरसागरसोबत भ्रष्टाचारातील भागीदार यशोदा शेट्टी व तिचा पती जीवन यांना अटक करण्यात आली. मात्र आपल्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची शक्यता लक्षात येताच हर्षकुमार पसार झाला. प्रेयसीसह वडिलांच्या नावावरदेखील त्याने साताऱ्यातील चाटे स्कूल परिसरात फ्लॅट घेतला आहे. त्याच परिसरात जीवननेही एक फ्लॅट खरेदी केल्याचे आता चौकशीत उघडकीस आले. बुधवारी दिवसभर तपास पथकाकडून हर्षकुमार व जीवनने खरेदी केलेल्या फ्लॅट व आतील साहित्याचा पंचनामा सुरू होता.

कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदाराचीदेखील चौकशी होणारवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांसह कंत्राटी कर्मचारी करणाऱ्या एजन्सीचीदेखील चौकशी होणार आहे. हर्षकुमारची नियुक्ती कुठल्या आधारावर केली गेली, अन्य कर्मचारी कशा प्रकारे नियुक्त केले जातात, ते करत असलेल्या कामाचे ऑडिट होते की नाही, या सर्व मुद्द्यांवर पोलिस तपास करत आहेत.

सोन्याच्या दागिन्यांसह महागड्या वस्तूंचा संचहर्षकुमारने घोटाळ्यातील बहुतांश रक्कम प्रेयसी व स्वतःच्या आवडीनिवडीवर खर्च केली. घर, वाहनांव्यतिरिक्त तो राहत असलेल्या फ्लॅटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्यंत महागड्या वस्तू आढळून आल्या आहेत. पोलिसांनी फ्लॅट ताब्यात घेतले आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी