लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सखी मंचच्या व्यासपीठावर एवढ्या मोठ्या प्रमाणात सखींची झालेली ही एकजूट अतिशय आनंददायक आहे. एक स्त्रीच दुसºया स्त्रीला मागे ओढण्याचा प्रयत्न करत असते, असे नेहमी म्हटले जाते; पण तुमच्यासारखेच इतर महिलांनीही विचार बदलले आणि एकमेकींना प्रोत्साहन दिले, तर पुरुषी वर्चस्वाला नक्कीच आळा बसेल, असा विश्वास स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘लेक माझी लाडकी’फेम सानिका म्हणजेच नक्षत्रा मेढेकरने व्यक्त केला.मकर संक्रांतीचा सण म्हणजे नाते दृढ करण्याचा, नात्यातील गोडवा वाढविण्याचा सण. ‘लोकमत’ सखी मंच व स्टार प्रवाह यांच्या वतीने गुरुवारी सायंकाळी लोकमत लॉन येथे सखींसाठी हळदी-कुंकू सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभिनेत्री नक्षत्राने मनमोकळा संवाद साधला. या कार्यक्रमाला सखींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. दुपारी १ वाजेपासूनच लोकमत लॉन सखींच्या गुजगोष्टींनी फुलू लागला होता. प्रवेशद्वाराजवळच हळदी-कुंकू लावून प्रत्येक सखींचे स्वागत करण्यात आले. तीळगूळ व संक्रांत वाण म्हणून एक आकर्षक बॅग देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या फॅशन शो मध्ये ‘शतदा प्रेम करावे’ हा सेगमेंट घेण्यात आला. या माध्यमातून महिलांना त्यांच्या मनात पतीविषयी असलेले प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली. यादरम्यान तीन फेºया घेण्यात आल्या. यामध्ये स्पर्धकांनी आपल्या जोडीदाराचे मन रिझविण्यासाठी गाणी, नृत्य, अभिनय आदींचे सादरीकरण केले व रागावलेल्या पतीला मनविण्यासाठी काय करतोत, याचे गुपित उलगडले. संक्रांत सोहळा अशी थीम असल्यामुळे स्पर्धकांनी हलव्याचे दागिने आणि काळी साडी असा पेहराव केला होता. यानंतर उखाणा स्पर्धाही सखींच्या प्रचंड उत्साहात पार पडली. तीळ व्यंजन स्पर्धेमध्ये महिलांनी तिळापासून तिखट व गोड असे चवदार पदार्थ तयार करून आणले होते. चेतना डिक्कर, कविता राजपूत यांनी फॅशन शो स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. डॉ. प्रेमला मुखेडकर, प्रा. अर्चना सोनवणे, अन्विता अग्रवाल यांनी उखाणे व तीळ व्यंजन स्पर्धांचे परीक्षण केले. नीता पानसरे यांनी संचालन केले.विविध स्पर्धांमधील विजेतेफॅशन शो-प्रथम- नीता नलावडे, द्वितीय- सुनंदा सोनवणे, तृतीय- निशा अग्रवाल.उखाणे-प्रथम- सारिका पाटील, द्वितीय- शीला जैन, तृतीय- शारदा जाधव.तीळ व्यंजन -मीनाक्षी विखणकर, उषा अग्रवाल.
हळदी-कुंकू सोहळ्याला औरंगाबादमध्ये सखींची विक्रमी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:24 IST
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : सखी मंचच्या व्यासपीठावर एवढ्या मोठ्या प्रमाणात सखींची झालेली ही एकजूट अतिशय आनंददायक आहे. एक ...
हळदी-कुंकू सोहळ्याला औरंगाबादमध्ये सखींची विक्रमी गर्दी
ठळक मुद्देसंक्रांत सोहळा : ‘स्टार प्रवाह’फे म सानिकावर प्रेमाचा वर्षाव; नात्यातील गोडवा वाढविण्याचा सण