शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दूध संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा हरिभाऊ बागडे; तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 13:29 IST

उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दोन मंत्री संदीपन भुमरे आणि अब्दुल सत्तार यांचे समर्थक रिंगणात आहेत.

औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी आमदार हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दोन मंत्री संदीपन भुमरे ( Sandeepan Bhumare ) आणि अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांचे समर्थक रिंगणात आहेत. भुमरे गटाचे दिलीप निरफळ तर सत्तार गटाचे गोकुळ सिंग राजपूत यांच्यात यांच्यात रस्सीखेच आहे. दुध संघावर हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांच्या पॅनलचे वर्चस्व आहे. यात सेना, भाजप आणि कॉंग्रेस असे तिन्ही पक्षांचे नेते एकत्र आले आहेत.

यावेळीही दूध संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले. त्यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस या पक्षांचे जिल्ह्यातील नेते एकत्र आले. मात्र, त्यांना निम्मे यश आले आणि १४ पैकी ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर उर्वरित ७ जागांसाठी मतदार घेण्यात आले. सर्वपक्षीय पॅनल विरुद्ध अपक्ष अशी लढत यानिमित्ताने पाहावयास मिळाली. सर्वसाधारण मतदारसंघापैकी वैजापूर, फुलंब्री, कन्नड व औरंगाबाद या चार, तर महिला राखीव २ आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १ अशा एकूण ७ जागांसाठी मतदान झाले होते. २३ जानेवारीला झालेल्या मतमोजणीनंतर १४ पैक्की १४ जागांवर हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलने वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतर आज अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. यावेळी आ. हरिभाऊ बागडे हे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.  

दुध संघातील सदस्य असे नंदू काळे (पैठण), सविता अधाने (खुलताबाद), श्रीरंग साळवे (सिल्लोड), दिलीप निरफळ (गंगापूर), इंदूबाई सुरडकर (एससी राखीव), श्रीमती चोपडे (सोयगाव), राजेंद्र जैस्वाल (ओबीसी) हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर औरंगाबाद तालुका : हरिभाऊ बागडे, कन्नड तालुका : गोकुळसिंग राजपूत, फुलंब्री तालुका : संदीप बोरसे, वैजापूर तालका : कचरू डिके, महिला राखीव मतदारसंघातून शीलाबाई काकासाहेब कोळगे, अलका रमेश पाटील डोणगावकर, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागासवर्गीय राखीव प्रतिनिधी- पुंडिलकराव काजे हे निवडणुकीतून विजयी झाले आहेत. 

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेAbdul Sattarअब्दुल सत्तारSandeepan Bhoomraसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबाद