शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमास नकार दिल्याने मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना सक्त मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 17:43 IST

Kidnapping of minor girl जालन्याकडे जाताना एका दुचाकीवर चौघे असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले व त्यांची गाडी थांबवली.

औरंगाबाद : प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. भिष्मा यांनी प्रत्येकी ३ वर्षे सक्त मजुरी आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.

सागर रामसिंग परदेशी (१९) आणि गणेश जनार्दन राठोड (१७, दोघे रा. बालानगर, पाचोड रोड अंबड) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत १६ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली होती. त्यानुसार, ५ मे २०११ रोजी फिर्यादी घराकडे परतत असताना मनोजसह (विधी संघर्ष बालक नाव बदललेले) दोघे आरोपी एका दुचाकीवर तेथे आले. प्रेम करण्यास नकार देते का, म्हणत आरोपी सागरने तिला बळजबरी दुचाकीवर तिघांच्या मध्ये बसविले. त्यानंतर आरोपी फिर्यादीला घेऊन प्रथम कचनेरला गेले व तेथून जालन्याकडे निघाले. जालन्याकडे जाताना एका दुचाकीवर चौघे असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले व त्यांची गाडी थांबवली. पोलिसांनी चौकशी करताच फिर्यादीने घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी चौघांना जालना पोलीस ठाण्यात आणले व घटनेची माहिती सिडको पोलिसांना दिली. सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तत्कालीन उपनिरीक्षक बी.यू. बोडखे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी अतिरिक्‍त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने वरील दोघा आरोपींना दोषी ठरवून भादंवि कलम ३६३ अन्वये ,प्रत्येकी ३ वर्षे सक्‍तमजुरी आणि प्रत्येकी ५ हजार दंड ठोठावला. प्रकरणात अ‍ॅड. मुंदवाडकर यांना अ‍ॅड. राधेशाम नरोटे यांनी सहाय्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयKidnappingअपहरणAurangabadऔरंगाबाद