हिंगोली : ‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने मंगळवारी शहरातील केमिस्ट भवन येथे श्रावणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सखी महोत्सवास उत्तम प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे उद्घाटन शार्ली ब्युटी पार्लरच्या मंजुश्री शहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मेघा सारीजच्या हर्षा सोमाणी, परि लेडीज कलेक्शनच्या उषाकिरण गायकवाड, गणेश गिफ्ट अॅण्ड नॉव्हेल्टीजच्या योगिता दुबे यांची उपस्थिती होती. यावेळी ब्रायडल मेकअप स्पर्धा घेण्यात आली. त्यात अर्चना जाधव, विद्या कोरडे, राजश्री नेमाडे, पूजा खंडेलवाल या विजेत्या ठरल्या. महेंदी स्पर्धेतील रचना गुंडेवार, शिवाजी उंडेगावकर, दीपाली कांबळे, दीपाली यंबल, कांचन वाकडे, पाककृती स्पर्धेत राजश्री साळुंके, करुणा आचलिया, प्रतिमा गुंडेवार, राधिका देशमुख, छाया गुंडेवार, फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये मधुरा सत्यपार (नंदलाल), करुणा आचलिया (दहिवाली), प्रतिमा तांभोरे (अंबाबाई), स्रेहा मुळे (लता मंगेशकर) या विजेत्या ठरल्या. परीक्षक म्हणून मंजुश्री शहाणे, हर्षा सोमाणी, उषाकिरण गायकवाड आदींनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी रजनी पाटील, माधुरी पारसकर, उज्ज्वला जिरवणकर, दिपाली सोवितकर यांनी केले. प्रायोजकत्व गणेश गिफ्ट अॅण्ड नॉव्हेल्टीज, मेघा सारीज, परि लेडिज कलेक्शन यांनी स्वीकारले होते. (वाणिज्य प्रतिनिधी)