शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

पोलीस दिसले अन् फासे पलटले; विद्यार्थ्यांना लुटून मोबाईलसाठी खंडणी मागणाऱ्या दोघांना बेड्या

By राम शिनगारे | Updated: July 29, 2022 19:07 IST

विद्यार्थ्यांना लुटून खंडणी मागणाऱ्या दोघांना वेदांतनगर पोलिसांनी घेतले ताब्यात 

औरंगाबाद : कॉलेजहून घरी जात असलेल्या एका विद्यार्थ्याचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी हिसकावून पळ काढला. त्या मोबाइलवर विद्यार्थ्याने फोन केला असता मोबाइल पाहिजे असेल, तर ३ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. याविषयी विद्यार्थ्यांनी वेदांतनगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने मोबाइल लुटून पैसे मागणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.

धनंजय प्रभाकर बोर्डे (२९, रा. भीमनगर, भावसिंगपुरा), सिद्धार्थ सुनील गवई (२२, रा. लालमाती, भावसिंगपुरा) असे आरोपींची नावे आहेत. अनिकेत अरविंद पाडसे (रा. लासूर स्टेशन, गंगापूर) याने दिलेल्या तक्रारीनुसार, अनिकेत पाडसे हा देवगिरी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेतो. सोमवारी कॉलेज संपल्यानंतर अनिकेत व त्याच्यासोबत अन्य दोन मित्र लासूर स्टेशनला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे पायी चालत जात हाेते. वेदांतनगर भागातील हॉटेल व्हिटसजवळून जात असताना बोर्डे व गवई हे दुचाकीवर आले. त्यांनी अनिकेत पाडसे याच्या हातातून मोबाइल हिसकावून पळ काढला. ही घटना घडल्यानंतर अनिकेतसोबत असलेल्या मित्राने अनिकेतच्या मोबाइलवर फोन लावून माझा मोबाइल असल्याचे सांगितले. त्यावर आरोपींनी मोबाइल हवा असेल, तर तीन हजार रुपये द्यावे लागतील, असे स्पष्ट केले. तसेच पैसे घेऊन गाडे चौकात येण्यास सांगितले. त्यानुसार विद्यार्थी गाडे चौकात जाण्यास निघाले.

पोलीस दिसले अन् फासे पलटलेदेवगिरी महाविद्यालयाजवळ विद्यार्थ्यांना वेदांतनगर ठाण्याचे काही पोलीस कर्मचारी दिसले. त्यांनी पोलिसांना हकीकत सांगितली. पोलिसांनी अनिकेत व त्याच्या मित्रांना गाडे चौकाकडे जाण्यास सांगितले. पोलिसांनी या विद्यार्थ्यांचा पाठलाग केला. विद्यार्थी आरोपीजवळ पोहोचल्यानंतर त्यांना झडप मारून पकडले. ही कामगिरी निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे, उपनिरीक्षक प्रमोद देवकाते, अंमलदार संदीप प्रधान, मट्टलवार, जारवाल, आडे आणि जमीर तडवी यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद