शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

विद्यापीठ अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी अर्धे उमेदवार बाद

By विजय सरवदे | Updated: April 15, 2023 20:12 IST

एकूण ३८ अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक २५ एप्रिल रोजी होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : अनेक महाविद्यालयांत पात्र पदव्युत्तर अध्यापक नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत अभ्यास मंडळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ५९ पैकी ३० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

एकूण ३८ अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक २५ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी ३ ते ११ एप्रिल या कालावधीत ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. बुधवारी कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्यासह निवडणूक समितीचे कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. सतीश पाटील, डॉ. भारती गवळी, डॉ. मुस्तजिब खान, डॉ. राम चव्हाण, डॉ. प्रवीण यन्नावार, डॉ. नंदिता पाटील, उपकुलसचिव दिलीप भरड, डॉ. ईश्वर मंझा आदींनी प्राप्त अर्जांची छाननी केली. यात ५९ पैकी ३० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी वैध-अवैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

अवैध उमेदवारांची नावे स्पष्टीकरणासह घोषित करण्यात आली असून या संदर्भात १५ एप्रिल सायंकाळपर्यंत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे उमेदवारांना अपिल दाखल करता येईल. या अपिलांवर १८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. १९ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात येणार आहे.

निवडणूक होणारी अभ्यासमंडळेअध्यक्षपदासाठी निवडणूक होणारी अभ्यास मंडळे अशी आहेत, यात मानव्यविद्या शाखा (१३ अभ्यास मंडळे)- अर्थशास्त्र, इंग्रजी, भुगोल, हिंदी, इतिहास, मराठी, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, उर्दू, सबस्टेंटिव्ह लॉ, प्रोसेजरल लॉ, विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा (१३ अभ्यास मंडळ)- वन्स्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रानिक्स, मत्स्यविद्या, गणित, सूक्ष्मजीवशास्त्र, पदार्थविज्ञान, प्राणिशास्त्र, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, कॉॅम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, वाणिज्यशास्त्र व व्यवस्थापन शास्त्र (पाच अभ्यास मंडळे) तसेच आंतरविद्या शाखा ७ अभ्यास मंडळ - शारीरिक शिक्षण संचालक, शारीरिक शिक्षण बीपीएड, शारीरिक शिक्षण प्राध्यापक, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक प्रशासन, गृहविज्ञान आदी विषयांचा समावेश आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद