शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

वातावरण बदलामुळे अर्धे शहर पडले आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:45 IST

खाजगी रुग्णालये हाऊसफुल, लहान मुलांनाही फटका

ठळक मुद्देशहरात साथ रोगांचे थैमान  महापालिकेने पुन्हा एकदा तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या

औैरंगाबाद : रिमझिम पाऊस, दिवसभर आभाळ या वातावरणामुळे शहरात साथरोगांनी थैमान घालायला सुरुवात केली आहे. अर्ध्याहून अधिक शहर आजारी पडले आहे. महापालिकेचे ३२ आरोग्य केंदे्र, खाजगी दवाखान्यांची ओपीडी हाऊसफुल होत आहे. लहान मुलांनाही या व्हायरलने घेरले असून, पोटात इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. काही भागांत महापालिकेच्या कृपेने दूषित पाणीपुरवठा होत असल्याने डायरियाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महापालिकेने पुन्हा एकदा तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

७ जूनला पावसाळ्याला सुरुवात झाली. ८ आॅगस्ट तोंडावर असताना शहरात एकही मोठा धो-धो पाऊस झालेला नाही. मागील दोन महिन्यांपासून निव्वळ पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. आठ दिवसांपासून तर दररोज आभाळ भरून येते. दिवसरातून दोन-चार वेळेस रिमझिम पाऊस येतो आणि निघून जातो. या विचित्र वातावरणामुळे शहरात साथरोगांनी पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक घरात एक तरी रुग्ण व्हायरल फिवरने अंथरुणाला खिळल्याचे दिसून येत आहे. काही कुटुंबांमध्ये तर सर्वच सदस्य आजारी पडले आहेत. जुन्या शहरातील औरंगपुरा परिसरात डायरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. एकाच ठिकाणचे हे रुग्ण नसून आसपासच्या परिसरातीलही आहेत. डेंग्यूसदृश तापाने फणफणलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ताप असलेल्या रुग्णांना चिकुनगुनियासारख्या वेदना सहन कराव्या लागत आहेत. कितीही औषध गोळ्या घेतल्या तरी ताप कमी होत नसल्याने रुग्ण हैराण झाले आहेत. ज्या भागांत डायरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्या भागांत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाने सूचना दिली आहे. दूषित पाणीपुरवठा त्वरित बंद करावे, असेही सांगितले आहे.

ओपीडी हाऊसफुलशहरातील सर्व छोट्या-मोठ्या रुग्णालयांमधील ओपीडी सकाळी आणि संध्याकाळी हाऊसफुल होत आहे. एका रुग्णालयामध्ये किमान १०० पेक्षा अधिक रुग्ण येत आहेत. महापालिकेच्या ३२ आरोग्य केंद्रांचीही अवस्था तशीच आहे. सकाळी ९ वाजताच अनेक ठिकाणी रुग्णांची लांबलचक रांग लागत आहे. 

नऊ आरोग्य अधिकारी नेमलेज्या भागात सर्वाधिक गरज आहे, तसे स्पॉट निवडून आरोग्य विभागाने शनिवारपासून शिबीर घेण्याचे निश्चित केले आहे. ओपीडी खूप वाढली आहे. एखाद्या विशिष्ट भागात साथरोगाचा उद्रेक झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. सावधगिरी म्हणून व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नऊ स्वतंत्र आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक या कामासाठी केली आहे.-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

पोटाचे इन्फेक्शन१ वर्षाच्या आतील मुलांना पोटाचे इन्फेक्शन होत आहे. हा आजारही व्हायरलमध्येच मोडतो. लहान मुलांना सर्दी, खोकला आणि तापाचे प्रमाणही वाढले आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये सकाळी ओपीडी १२० रुग्णांपर्यंत जात आहे. ढगाळ वातावरणामुळे व्हायरल आजार मोठ्या प्रमाणात वाढले असून, रुग्णांवर त्यादृष्टीनेच उपचार करण्यात येत आहेत.-डॉ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ

शिबीर घेण्याची सूचनाशहरातील विविध डेंजर झोनमध्ये सकाळ, संध्याकाळ धूरफवारणी, औषध फवारणी, अ‍ॅबेट ट्रीटमेंट, सर्वेक्षण करण्याची सूचना आरोग्य विभागाला दिली आहे. शहरातील मनपाच्या नऊ झोनमध्ये आरोग्य शिबीर घेण्याची सूचना दिली आहे. आणीबाणी समजून आरोग्य विभाग कामाला लागला आहे. - नंदकुमार घोडेले, महापौर 

टॅग्स :doctorडॉक्टरMedicalवैद्यकीयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद