शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

मराठवाड्यात गारपीट; फळबागा, खरीप पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 12:04 IST

Hailstorm in Marathwada : गारपिटीने शेतकऱ्यांची धांदल उडाली. फळबागा, रब्बी गहू, कांदा व काढणीला आलेल्या कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

औरंगाबाद / जालना/हिंगोली : मराठवाड्याच्या काही भागांत मंगळवारी गारपीट झाली (Hailstorm in Marathwada) . वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने फळबागा व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुन्हा अचानक आलेल्या या आपत्तीमुळे बळीराजाला मोठा फटका बसला आहे (In Marathwada excessive damage to fruit farming and kharif crops due to hailstorm ) . औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, गंगापूर तसेच वैजापूर आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपीट झाली. हिंगोलीसह काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील जामगाव शिवारात ऊस काढणीसाठी कन्नड व तीसगाव येथून आलेल्या नऊ कुटुंबांना अवकाळी गारपिटीचा चांगलाच फटका बसला. पाल उडून गेल्याने या कुटुंबाला गारपिटीचा मार सहन करावा लागला. पालावरील जीवनावश्यक वस्तू व अन्यधान्याची नासाडी झाल्याने ऊसतोड कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच तालुक्यातील वाहेगाव, सिद्धपूर, जामगाव, कायगाव, भेंडाळा, अंमळनेर शिवारात शेतकऱ्यांची धांदल उडाली. रब्बी गहू, कांदा व काढणीला आलेल्या कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा, लोहगाव, बालानगर, जायकवाडी, टाकळी पैठण, पाचोड, कडेठाण, लिंबगाव, ढाकेफळ, अमरापूर वाघुंडी, मुलानी वाडगाव, तोंडोळी, ७४ जळगाव, लामणगाव, ब्रम्हगव्हाण, जोगेश्वरी, खादगाव, विहामांडवा, थेरगाव आदी परिसराला मंगळवारी दुपारी चारनंतर वादळी वारे, गारांसह पडलेल्या पावसाने झोडपून काढले. यासह दावरवाडी, रांजणगाव खुरी, चितेगाव, बिडकीन परिसराला पावसाने झोडपले. कन्नड तालुक्यातील पिशोरमध्येही गारपीट झाली. सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने गहू व इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले.

जालन्यात वीज कोसळून बैल ठारजालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. खरीप हंगामातील गहू, मका पिके आडवी झाली, तर वालसावंगी येथे वीज कोसळून एक बैल ठार झाला. वालसावंगी, पद्मावती, पारध, अवघडराव सावंगी, सुंदरवाडी, सिपोरा बाजारसह आदी भागांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला व मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली.

हिंगोलीत विजांचा कडकडाटहिंगोली जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजेपासूनच विजांचा कडकडाट सुरू झाला. कळमनुरी, औंढा नागनाथ, डिग्रस कऱ्हाळे, खुडज आदी ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. येत्या २ ते ८ जानेवारी २०२२ दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :HailstormगारपीटAurangabadऔरंगाबादHingoliहिंगोलीJalanaजालना