शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षात ६१ कोटींचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:14 IST

बंदी असूनही चोरी-छुपे गुटखा विकल्या जात आहे. मागील दीड वर्षात मराठवाड्यातील १२२६ दुकानांतून ६१ कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू जप्त करण्यात अन्न व औषध विभागाला यश आले आहे. यातील ८३७ जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देअन्न व औषध विभागाची कारवाई : मराठवाड्यात ८३७ जणांवर खटले दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बंदी असूनही चोरी-छुपे गुटखा विकल्या जात आहे. मागील दीड वर्षात मराठवाड्यातील १२२६ दुकानांतून ६१ कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू जप्त करण्यात अन्न व औषध विभागाला यश आले आहे. यातील ८३७ जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत.गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट सुपारी यांचे उत्पादन, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर राज्य शासनाने जुलै २०१२ मध्ये बंदी घातली आहे. कारण गुटख्याच्या सेवनाने तोंडाचा कर्करोग होत असून, त्यात अनेकांचे जीव गेले आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात जरी गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखूवर बंदी असली तरी परप्रांतात नाही. त्यामुळे चोरी-छुपे गुटखा परप्रांतातून आणला जात आहे. अवैधरीत्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाºयांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहेत.जानेवारी २०१७ ते मे २०१८ या कालावधीत या विभागाने मराठवाड्यातील १६ हजार १९३ पानटपºया, दुकान, गोदामांची तपासणी केली. त्यातील १२२६ दुकानांतून ६१ कोटी १५ लाख ४४ हजार १३१ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी जप्त केली. त्यातील ६६९ विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. ८३७ जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले. कारवाई सुरूच आहे.जिल्ह्यात ५० लाखांचा गुटखाअन्न व औषध प्रशासनाने मागील दीड वर्षात जिल्ह्यातील ४० पानटपºया, दुकाने व गोदामांवर छापे टाकून ५० लाखांचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.बॉयलरमध्ये जाळणार गुटखा३ वर्षे ५ महिन्यांत ४३ ठिकाणांहून जप्त केलेला ९२ लाखांचा गुटखा १७ डिसेंबर २०१६ रोजी एका आॅईल मिलच्या बॉयलरमध्ये जाळण्यात आला होता. सुमारे १० टन गुटखा जाळण्यासाठी १२ तास लागले होते. त्यानंतर मागील दीड वर्षात जिल्ह्यात जप्त केलेला ५० लाखांचा गुटखा येत्या महिनाभरात जाळण्यात येणार आहे. गुटखा उघड्यावर जाळता येत नाही. रोडरोलरखाली ठेवला तरीही तो नष्ट होत नाही. बॉयलरमध्ये गुटखा जळून खाक होतो. बॉयलर असलेल्या कंपनीचा होकार मिळताच आम्ही गुटखा जाळून टाकू.-चं.भा. पवार, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा