शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

गुजरातच्या कंपनीला समृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन भोवले, भरावाच लागणार ३२८ कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 16:17 IST

Samrudhi Mahamarga : दिग्गज वकिलांची फौज निष्प्रभ, सर्वोच्च न्यायालयाने कंपनीचे अपील फेटाळले

औरंगाबाद/जालना : मुंबई ते नागपूर असा जवळपास ७०० किलोमीटर लांबीचा सुपर एक्स्प्रेस-वे अर्थात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे महामार्गाचे (amrudhi Mahamarga ) काम जालना जिल्ह्यात करणाऱ्या गुजरातमधील कंपनीला ठोठावण्यात आलेला ३२८ कोटी रुपयांचा दंड (Gujarat company involved in illegal excavation for Samrudhi Mahamarga, will have to pay a fine of Rs 328 crore) सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यासमृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराला ३२८ कोटींचा दंड भरावाच लागणार आहे.

जालना जिल्ह्यातून हा समृद्धी महामार्ग २५ गावांमधून जवळपास ४२ किलोमीटर जात आहे. हे एक हजार ३०० कोटी रुपयांचे काम गुजरातमधील मेसर्स मॉन्टेकार्लो कंपनीने केले आहे. हे काम करत असताना या कंपनीने अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणावर मुरूम, माती तसेच वाळूचा उपसा केला होता. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार जालना तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ आणि बदनापूरच्या तत्कालीन तहसीलदार छाया पवार यांनी संयुक्तरीत्या प्रत्यक्ष स्थळपाहणी करून अवैध गौण खनिज उत्खनन केल्याची चौकशी केली होती. या दोन्ही तालुक्यांत मिळून जवळपास ३२८ कोटी रुपयांचे गौण खनिज हे परवानगीपेक्षा अधिकचे उत्खनन केल्याचे नमूद केले. त्यानुसार हा ३२८ कोटी रुपयांचा दंड कंपनीला आकारण्यात आला होता.

या दोन्ही तहसीलदारांनी आकारलेल्या दंडाविरुद्ध कंपनीने जिल्हाधिकारी तसेच अन्य महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे महसूल जमीन अधिनियम २४७ अन्वये दाद मागणे आवश्यक होते; परंतु तसे न करता हा दंड चुकीचा आकारण्यात आला असून, आम्ही राज्य सरकारची परवानगी प्रकल्प मंजुरीच्या वेळेसच काढल्याचे नमूद करत कंपनीने थेट औरंगाबाद येथील मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच प्रकरणात बदनापूरचे माजी आ. संतोष सांबरे यांनीही हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. यावर सप्टेंबर महिन्यात औरंगाबादेतील खंडपीठात सुनावणी पूर्ण करून न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी कंपनीची याचिका फेटाळली होती. या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाविरुद्ध कंपनीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती; परंतु तेथेही औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने ३ डिसेंबर २०२१ रोजी कंपनीची याचिका फेटाळली आहे. कंपनीने यासाठी अनेक दिग्गज वकिलांची फौज उभी केली होती.

आता दंड वसुलीचे आव्हानमॉन्टेकार्लो कंपनीने मुंबईसह सुप्रीम कोर्टात ३२८ कोटींचा दंड रद्द करावा, अशा याचिका दाखल केल्या होत्या; परंतु त्या याचिका दोन्ही न्यायालयांनी मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आम्ही अवैध गौण खनिज प्रकरणात जो दंड आकारला होता. तो जवळपास मान्य झाला आहे. त्यामुळे आता आमच्यासमोर कंपनीकडून हा दंड वसूल करण्याचे आव्हान असून, याबाबत आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन नंतरच योग्य ती कारवाई करू.- श्रीकांत भुजबळ, तहसीलदार, जालना

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादJalanaजालनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय