हिंगोली : येथील आदर्श महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा आणि व्यवसाय मार्गदर्शन कक्षातर्फे १३ सप्टेंबर रोजी सकाळी ज्येष्ठ विधीज्ञ राजेंद्र गोडबोले यांचे व्याख्यान घेण्यात आले. त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा? याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरूष समानता हे मूल्य रुजविण्यासाठी शासनाने पुरस्कृत केलेल्या ‘जागर जाणिवांचा’ या अभियानाचा भाग म्हणून सदरील कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी.एन. बर्वे होते. याप्रसंगी डॉ. विलास आघाव, डॉ. संजय नरवाडे, प्रा. डी.एन. केळे, डॉ. एन.एस. सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. गोडबोले यांनी मार्गदर्शन करताना, स्पर्धा परिक्षेची गुरूकिल्ली म्हणजे व्यक्तिमत्व विकास होय. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करावा. कारण अभ्यासातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो. ज्याचे व्यक्तिमत्व विकसित झाले तोच अशा परीक्षांमध्ये यशस्वी होवू शकतो, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. बी.बी. लक्षटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टी.आर. हापगुंडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. एस.पी. हाटकर यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. सोनलकुमार नगरकर, प्रा. ए.के. पठाण, प्रा. पांपटवार, प्रा. व्ही.डब्ल्यू. सावतकर यांनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)
स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन
By admin | Updated: September 13, 2014 23:03 IST