शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

'संरक्षित मोर पंखाच्या विक्रीवर जीएसटी वसूल'; वनविभागाचे पथकही चक्रावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 1:39 PM

मोरपंखाचे सुंदर पंखे तयार करून ते शहरात विविध ठिकाणी विक्री करणाऱ्या पाच जणांना मंगळवारी वनविभागाच्या पथकाने पकडले होते.

ठळक मुद्देसंरक्षित मोरांचा जंगलात शिकारीचा संशयएकाच विक्रेत्याकडे सापडले तब्बल पाच हजार मोरपंख

औरंगाबाद: शहरात मोरपंख विकणाऱ्या पाच परप्रांतीय विक्रेत्यांना वनविभागाने मंगळवारी पकडून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे तब्बल पाच हजार मोरपंख आढळले. यात धक्कादायक बाब म्हणजे हे मोरपंख रीतसर विकत घेतल्याची त्या विक्रेत्याकडे पावती असून त्यावर त्याने जीएसटीही भरलेला आहे. राष्ट्रीय पक्षाच्या पंख विक्रीला लागलेला जीएसटी पाहून वनविभागाचे पथकही चक्रावले आहे. आता हा जीएसटी कुणी व कसा लावला, या पावत्याची सत्यता तपासली जात आहे.

देशाने मोराला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेला असून तो अतिसंरक्षित आहे. मोरपंखाचे सुंदर पंखे तयार करून ते शहरात विविध ठिकाणी विक्री करणाऱ्या पाच जणांना मंगळवारी वनविभागाच्या पथकाने पकडले होते. त्यांच्या झाडाझडतीत पाच हजाराहून अधिक मोरपंख या पथकाला सापडली. हे मोरपंख त्यांनी उत्तरप्रदेशातून विकत घेतली आहेत. संबंधित दुकानाची त्यांच्याकडे पावती असून या व्यवहारावर जीएसटीही लावण्यात आलेला आहे. अतिसंरक्षित राष्ट्रीय पक्षाच्या पंखाला विक्रीची परवानगी कुणी दिली व त्या व्यवहारावर जीएसटी कसा लागला, याचा शोध आता स्थानिक वनविभागाचे पथक करत आहे. या पथकाने स्थानिक जीएसटी अधिकाऱ्याकडे यासंदर्भात माहिती घेणे सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोर तस्करीचा संशयहंगामात मोरांचे पंख गळतात. ते जंगलात आढळतात. ते जंगल संपत्ती म्हणून गणली जाते. ती कुणालाही उचलता येत नाही. परंतु या विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात सापडलेले मोरपंख पाहता, मोरांची मोठ्या संख्येने शिकार होऊन हे पंख तस्करांनी विक्री केल्याचा संशय निर्माण होत असल्याने पथक त्यादृष्टीनेही तपास करते आहे.

शहरात एवढे तर देशभरात किती?आकर्षक नक्षीदार गुंफण केलेले हे मोरपंख परराज्यातून आलेली मुलं शहरातील विविध चौकातून गेल्या आठ दिवसापासून विक्री करतांना दिसत होते. या विक्रेत्यांकडे सापडलेला पंख साठा पाहता, देशभरात किती मोरांची शिकार होत असेल, हा आकडा चक्रावणारा आहे. विशेष म्हणजे मोर वन कायदा १९७२ नुसार संरक्षित आहे.

माहितीनुसार अधिकारी पुढील पाऊले उचलणार...जीएसटी बिल, खरेदी कशी होते, हे तपासले जात आहे. बिलाची चाचपणी सुरू असून अहवाल आल्यानंतर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार पावले उचलली जातील.-वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे.

टॅग्स :forest departmentवनविभागAurangabadऔरंगाबादGSTजीएसटी