शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांना जीएसटी लावल्याने औरंगाबाद महापालिकेत उफाळला वाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:30 IST

. मागील वर्षी नोंदणी शुल्क ९३५ रुपये घेऊन परवानगी देण्यात येत होती. यंदा प्रशासनाने जीएसटी, नोंदणी शुल्कात दहा टक्केवाढ केली

ठळक मुद्दे गणेश मंडळांच्या सोयीसाठी महापालिकेने एक खिडकी योजनेंतर्गत परवानगी देणे सुरू केले आहे. मागील वर्षी नोंदणी शुल्क ९३५ रुपये घेऊन परवानगी देण्यात येत होती. २००६ पासून वाढीव शुल्क म्हणून २२०० रुपये घेणे सुरू केले आहे

औरंगाबाद : गणेश मंडळांच्या सोयीसाठी महापालिकेने एक खिडकी योजनेंतर्गत परवानगी देणे सुरू केले आहे. मागील वर्षी नोंदणी शुल्क ९३५ रुपये घेऊन परवानगी देण्यात येत होती. यंदा प्रशासनाने जीएसटी, नोंदणी शुल्कात दहा टक्केवाढ केली असून, २००६ पासून वाढीव शुल्क म्हणून २२०० रुपये घेणे सुरू केल्यामुळे गणेश मंडळांनी मनपाच्या या कारभारावर टीकेची झोड उठविली. त्यानंतर सायंकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी हस्तक्षेप करून शुल्क निम्म्यावर आणले.

गणेश मंडळांसाठी महापालिका, पोलीस, वीज कंपनी यासह इतर विभागांनी एकत्र येऊन  एक खिडकी योजना सुरू केली आहे. आवश्यक कागदपत्रे एकत्र करून काही गणेश मंडळे नोंदणीसाठी आले असता, त्यांना तब्बल २२०० रुपयांचा भरणा करा, अशा सूचना महापालिकेतर्फे देण्यात आल्या. मागील वर्षी नोंदणी शुल्क ९३५ रुपये होते. २००६ मध्ये सर्वसाधारण सभेत नोंदणी शुल्कात दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा ठराव झाला आहे. २००६ ते २०१८ पर्यंतची रक्कम आणि १८ टक्के जीएसटी शुल्क लावून २२०० रुपये होते, असे मनपा कर्मचाऱ्यांनी सांगितले.

यानंतर गणेश मंडळांनी महापालिकेच्या विरोधात मोर्चा उघडला. काही मंडळांनी थेट महापौरांकडे तक्रारी केल्या. महापौरांनी गतवर्षीच्या रकमेत दहा टक्के वाढ झाली पाहिजे. अचानक २००६ पासूनची वाढ कशी काय आठवली, असा प्रश्न करत नव्याने आदेश काढण्याच्या सूचना केल्या. हा प्रकार त्यांनी आयुक्तांच्या कानावर टाकला. त्यानंतर सुधारित आदेश काढण्यात आले. आता गणेश मंडळांना १२१४ रुपये भरावे लागणार आहेत. गणेशमूर्ती, मंडपांना शासनाने जीएसटीमधून सूट दिली आहे. असे असताना मनपाने मात्र मंडळांना १८ टक्के  जीएसटी लावण्याचे धाडस केले, हे विशेष. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGSTजीएसटीGaneshotsavगणेशोत्सव