शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:33 IST

अनेकदा शेतकरी नवरदेव असल्याने मुली किंवा मुलीच्या घरची मंडळी थेट नकार कळवतात.

उंडणगाव (औरंगाबाद ) :  लाखो रुपये किंमतीच्या जमिनीचा मालक उच्चशिक्षित असला तरीही लग्न गाठ बांधायला कुणी हो म्हणत नाही. लग्नासाठी मुलगी वाले नोकरी वाल्यांचा शोधात आहे. शेतकरी नवरदेवांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी लग्नासाठी प्रस्ताव पाठवले. पण लग्नगाठ बांधायला कुणी तयार नाही. शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई... 

शेतकरी नवरदेव असल्याने मुली किंवा मुलीच्या घरची मंडळी थेट नकार कळवतात. तसेच गरीबातील गरीब ही नोकरी वाला नवर देव मिळावा हाच हटहास धरून बसतात. तुळशी विवाह सोहळा झाल्यावर लग्न गाठी बांधण्याची जुळवा जुळव सुरू होऊन लग्न सराईला सुरूवात होते. सनई चौघड्याचे सुर वाजण्याला सुरूवात होते. सर्वेत्र मंगलमय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

काही जणांचे जमले तर ते साखरपुड्यातच उरकून टाकण्याला मागे पुढे पहात नाही. लग्न गाठी जमवितांना सध्या मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण प्रत्येकांनी स्थळ हे नोकरी चेच पाहिजे. मग देणे कितीही मोजावे लागले तरी ते मागे न हटता लग्न जमविण्याचा प्रयत्न करतातच. शेतकरी मुलांना पसंती कमी दाखवू लागले आहेत. सगळ्यांनी शेतकरी असल्याने नकार देतात. शेतकरी नवरा नको, सरकारी नोकरी आणि तोही एखाद्या विभागात शिपाई असला तरी चालेल असे अनेक जण म्हणतात. 

...मग शेती कोण करेल शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटं आले तरी शेतकरी महिन्याला हजारो रुपये कमवितात. पण लग्न करण्यासाठी हे उत्पन्न ही पुरेसे असते. शेतकरी असल्याने अनेक मुलींनी नकार देऊन टाकतात. जे तरुण शेती करतात. त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशीच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुण शेतकऱ्यांच्या पिढीला लग्नाशिवाय काही वर्षे तसेच राहावे लागते असलेल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे तरुणांनी शेती करणं सोडून दिले तर आता आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती कोण करेल, हा आकडा भविष्यात आणखी वाढेल. अशी भीती काही जाणकार शेतकऱ्यांना वाटत आहे. 

टॅग्स :marriageलग्नFarmerशेतकरीagricultureशेती