शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

महापुराचा फटका ! नारेगावात दोन हजार कुटुंबियांचा दु:ख, अश्रूचा पूर थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 16:30 IST

Flood in Aurangabad : शनिवारी शहर साखरझोपेत असताना विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पावसाला सुरुवात झाली.

ठळक मुद्देकोणाला काही कळण्यापूर्वी सुखना नदीपात्राने रौद्ररूप धारण केले. अनेक घरांमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले.

औरंगाबाद : सुखना नदीपात्राने ( Sukhana river flood ) शनिवारी पहाटे रौद्ररूप धारण केल्याने नारेगाव परिसरातील किमान दोन हजार कुटुंबांना पुराचा तडाखा बसला. अनेकांचे संसारच उघड्यावर आले. कालपासून कोणाच्याही घरात चूल पेटली नाही. आसपासच्या नागरिकांनी जे दिले, त्यावरच पोटाची खळगी भरली. शासकीय यंत्रणांकडून कोणतीही मदत नाही. माणिकनगर, पटेलनगर, आनंद गाडेनगर, अझीझ कॉलनी, बिस्मिल्लाह कॉलनीतील रहिवाशांच्या वेदना कायम आहेत. ( The grief of two thousand families in Naregaon, the flood of tears will not stop) 

सावंगी तलावासह पंचक्रोशील छोटे-छोटे तलाव, ओढ्याचे पाणी सुखना नदीपात्राला येऊन मिळते. शनिवारी शहर साखरझोपेत असताना विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पावसाला सुरुवात झाली. कोणाला काही कळण्यापूर्वी सुखना नदीपात्राने रौद्ररूप धारण केले. सर्वांत पहिला तडाखा नारेगावमधील माणिकनगर, पटेलनगर, आनंद गाडेनगर, अझीझ कॉलनी, बिस्मिल्लाह कॉलनीमधील गोरगरिबांना बसला. अनेक घरांमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले. यात गृहोपयोगी वस्तू वाहून गेल्या. अन्न-धान्य भिजले. दीड ते दोन हजार घरांमध्ये पाणीच पाणी होते. सकाळी ११ वाजेनंतर पुराचे पाणी ओसरू लागले. परंतु, शनिवारी या भागातील घरांमध्ये चूल पेटली नाही. आसपासच्या अनेक नागरिकांनी भात शिजवून आणून दिला. रविवारीही अनेक घरांमध्ये चिखलच चिखल होता. लोकांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.

चिकलठाण्यात दोन पूल, भिंत पडल्याचिकलठाण्यात आठवडी बाजार येथील पूल वाहून गेला. त्यामुळे महालप्रिंप्रीकडे ये-जा करणारी वाहतूक बंद झाली. दोन घरांच्या भिंती कोसळल्या. पुराचे पाणी एक ते दोन फुटांपर्यंत घरात शिरल्याने घरात गाळ भरला. स्मशानभूमीच्या भिंती काेसळल्या. स्मशानभूमीकडे जाणारा पूलही खचला.

राजकीय नेत्यांचे पर्यटनआ. अंबादास दानवे यांनी रविवारी नारेगाव भागाला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे आ. हरिभाऊ बागडे यांनी चिकलठाणा येथील आठवडी बाजाराच्या पुलाची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे त्वरित करायला लावतो, मनपा प्रशासनाकडून खचलेले पूल पुन्हा बांधून घेण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादfloodपूर