शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कमाल झाली ! स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसानेच जायकवाडीच्या साठ्यात मोलाची भर पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 18:54 IST

यंदा मात्र नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब आलेला नसताना जायकवाडीच्या जलसाठ्यात केवळ स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने भर पडली.

ठळक मुद्देस्थानिक पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस धरणाचा जलसाठा शुक्रवारी  सायंकाळी ४२.३९ टक्के झाला होता.

पैठण : गुरूवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडीचा जलसाठा रात्रीतून पाऊण 'टीएमसी'ने वाढला आहे. जायकवाडी धरणावर ८२ मी.मी. पावसाची नोंद झाली असून धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने  जलसाठ्यात मोठी भर पडली. १ जून पासून २२६.४४३ दलघमी ( ८ टिएमसी) जलसाठ्यात भर पडली आहे. गत वर्षी धरणावर एकूण ४९६ मि मी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र २३ जुलै रोजीच धरणावर एकूण  ४९६ मि मी पाऊस नोंदवला गेला आहे. धरणाचा जलसाठा शुक्रवारी  सायंकाळी ४२.३९ टक्के झाला होता.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्यावरच जायकवाडीची भिस्त असल्याचे गेल्या काही वर्षांत समोर आले आहे. परंतु, यंदा मात्र नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब आलेला नसताना जायकवाडीच्या जलसाठ्यात केवळ स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने भर पडली आहे. जायकवाडी धरणाचे स्थानिक व मुक्त पाणलोट असलेल्या औरंगाबाद, गंगापूर, नेवासा, पैठण, शेवगाव ,वैजापूर, श्रीरामपूर, येवला, शिर्डी आदी भागात पावसाने सातत्य राखल्याने १ जून पासून जलसाठ्यात भर पडण्यास प्रारंभ झाला आहे.

गुरुवारच्या पावसाने मोठी आवक गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने धरणात २० दलघमी पाण्याची आवक झाल्याचे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, संदीप राठोड यांनी सांगितले.  आज रोजी धरणात १६५८ दलघमी ( ५८ टिएमसी) जलसाठा झाला आहे. यापैकी उपयुक्त जलसाठा ९२० दलघमी ( ३२ टीएमसी )  ईतका आहे. 

यंदा धरण १००  टक्के भरण्याची अपेक्षा...जायकवाडी धरणात अद्याप नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्याची आवक झालेली नाही. स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने जलसाठ्यात झालेली वाढ अत्यंत दिलासा देणारी आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून आवक आल्यास जायकवाडी धरण यंदा १००% भरेल अशी अपेक्षा कडाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण