शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘जय ज्योती...जय सावित्री’च्या निनादात फुले जयंतीची शानदार मिरवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:12 IST

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सायंकाळी क्रांतीचौकातून शानदार मिरवणूक काढण्यात आली. घोडेस्वार, उंटस्वार, भालदार, चोपदार, वासुदेव व गोंधळी यांच्या सहभागाने व कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील फुले पगडी व हातात पिवळ्या झेंड्यावर फुले यांची भव्य प्रतिमा यामुळे ही मिरवणूक नटली होती, सजली होती

ठळक मुद्देमहिला व तरुणांमध्ये उत्साह : सजीव देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष

औरंगाबाद : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सायंकाळी क्रांतीचौकातून शानदार मिरवणूक काढण्यात आली. घोडेस्वार, उंटस्वार, भालदार, चोपदार, वासुदेव व गोंधळी यांच्या सहभागाने व कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील फुले पगडी व हातात पिवळ्या झेंड्यावर फुले यांची भव्य प्रतिमा यामुळे ही मिरवणूक नटली होती, सजली होती. महिला व तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. महात्मा फुले यांच्या अकरा फुटी पुतळ्याने व फुले, सावित्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सजीव देखाव्यानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.अ. भा. माळी शिक्षण व समाजप्रबोधन संस्था, महात्मा फुले युवा दल व समस्त माळी समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे हे यंदाचे दुसरेच वर्ष होय. गतवर्षीपासून ही प्रथा सुरू झाली. यावर्षी तिचे स्वरूप भव्य झाले.छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही मिरवणूक सायंकाळी सुरू झाली. नूतन कॉलनी, पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडीमार्गे ही मिरवणूक औरंगपुरा येथे येऊन विसर्जित झाली. अ. भा. माळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम गाडेकर, महिला आघाडी राज्याध्यक्षा अनिता गायकवाड, विभागीय अध्यक्ष सोमनाथ जाधव, विश्वस्त जयंतराव गायकवाड, लता पवार, अनिता ताठे, अनिता देवतकर, संगीता पवार व सुभद्रा जाधव यांच्या संयोजनाखाली ही मिरवणूक काढण्यात आली. जयरामकाका साळुंके, एल. एम. पवार, डॉ. संजय गव्हाणे, राम पेरकर, शशिकला खोबरे, सरस्वती हरकळ, संगीता गाडेकर, प्रतिभा शेवाळे, हरिभाऊ पवार, शिवाजी गाडेकर, मुक्ताई महिला मंडळ व संत सावता मंदिर वसतिगृहाचे विद्यार्थी मिरवणुकीत चालत होते. महात्मा फुले युवा दलाचे देव राजळे, मोहित जाधव, अतुल राऊत, सीताराम विधाते, संजय ठोके, सुशील बोर्डे, संदीप हिंगे, सागर होले, महेश सत्रे, सचिन शिंदे, संतोष उगले, शिवराम राऊत, बाळकृष्ण बनसोड आदींनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. आमदार अतुल सावे, कदीर मौलाना, नगरसेविका कीर्ती आदींनी काही वेळ मिरवणुकीत सहभाग घेतला.लक्षवेधी सजीव देखावा रितेश डेंगळे याने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, श्रेयस बल्लाळ याने सादर केलेल्या श्रेयस बल्लाळ, अंजली कोंडावार या मुलीने सादर केलेली सावित्रीबाई फुले, तनुजा कुलकर्णी हिने सादर केलेली राजमाता जिजाऊ, सौरभ कोरडे याने सादर केलेले राजर्षी शाहू महाराज व गणेश सावेकर याने सादर केलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सजीव देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महात्मा फुले यांचा अकरा फुटी पुतळा तर लक्षवेधी ठरला.--------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक