शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा उच्च शिक्षण विभागावर भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्या मान्य करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालक कार्यालयावर मंगळवारी सकाळी ११ वाजता अहिल्याबाई होळकर चौक ते सहसंचालक कार्यालयादरम्यान विराट मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देघोषणाबाजीने परिसर दणाणला : सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीलकर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्या मान्य करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालक कार्यालयावर मंगळवारी सकाळी ११ वाजता अहिल्याबाई होळकर चौक ते सहसंचालक कार्यालयादरम्यान विराट मोर्चा काढण्यात आला.राज्यातील अकृषी विद्यापीठ कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी १० जूनपासून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. अकृषी विद्यापीठातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाने रद्द करण्यात आलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करावेत, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मागील आठवड्यात कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग नोंदवला. यानंतर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने करण्यात आली. तिसºया टप्प्यातील आंदोलन मंगळवारी करण्यात आले. सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चौथ्या टप्प्यात २५ जून रोजी पुणे येथे उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जुलै महिन्यात बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही सहसंचालकांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.सहसंचालक कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कर्मचाºयांनी जोरदार घोषणाबाजी केली. संघटनेचे अध्यक्ष पर्वत कासुरे, राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, प्रकाश आकडे, अनिल खामगावकर, महिला प्रतिनिधी नजमा खान यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपकुलसचिव विष्णू कºहाळे, संजय कवडे, संजय शिंदे, डॉ. पंजाबराव पडूळ आदी उपस्थित होते. या मोर्चाला बामुक्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ. अंकुश कदम, सरचिटणीस डॉ. फुलचंद सलामपुरे, बामुटाचे अध्यक्ष डॉ. रत्नदीप देशमुख, सचिव डॉ. स्मिता अवचार यांनी पाठिंबा दिला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEmployeeकर्मचारीuniversityविद्यापीठ