लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कडपदेव येथील तत्कालीन ग्रामसेवकाने २.३५ लाखांचा अपहार केल्याच्या प्रकरणासह विविध कारणांवरून निलंबित केल्याचा आदेश जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी काढला आहे.कळमनुरी पंचायत समितीअंतर्गत कडपदेव येथे कार्यरत असताना ग्रामसेवक आर.टी. ख्रिस्ते यांनी वृक्षलागवडीसंदर्भात कोणत्याच नोंदी ठेवल्या नाहीत. तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचे बक्षीस व ग्रामनिधीत ८१ हजार ९५0 रुपयांचा अपहार केल्याचा अहवाल बीडीओंनी दिला होता. त्याचबरोबर तंटामुक्ती योजनेतच सौरदिवा खरेदी प्रक्रियेत १.५३ लाखांची अनियमितता केली. याबाबत लेखाआक्षेपही निघाला आहे. त्यामुळे नोटिसा बजावल्यानंतरही समाधानकारक खुलासा सादर केला नाही. यावरून निलंबनाचे आदेश काढले असून या काळात वसमत मुख्यालय देण्यात आले आहे.
अपहार प्रकरणात ग्रामसेवक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:43 IST