शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन होणार आता बँकेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 18:43 IST

राज्यभरातील जवळपास २८ हजार ग्रामपंचायतींच्या कर्मचार्‍यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने थेट कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना वेतन अदा करताना ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा हस्तक्षेप थांबणार आहे. 

ठळक मुद्देग्रामविकास विभागाच्या वतीने या कर्मचार्‍यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय ६ जानेवारीला घेण्यात आला आहे.या योजनेंतर्गत बँकेमार्फत ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाईन वेतनप्रणाली विकसित करण्यात येणार असून, कर्मचार्‍यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे.

- शेख महेमूद औरंगाबाद : राज्यभरातील जवळपास २८ हजार ग्रामपंचायतींच्या कर्मचार्‍यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने थेट कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना वेतन अदा करताना ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा हस्तक्षेप थांबणार आहे. 

ग्रामविकास विभागाच्या वतीने या कर्मचार्‍यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय ६ जानेवारीला घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करारनामा करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत बँकेमार्फत ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाईन वेतनप्रणाली विकसित करण्यात येणार असून, कर्मचार्‍यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. ग्रामसेवकांमार्फत कर्मचार्‍यांची सर्वंकष माहिती या वेतनप्रणालीवर भरून ही माहिती गटविकास अधिकार्‍यांकडून प्रमाणित केली जाणार आहे. कर्मचार्‍यांच्या वेतन देयकातील शासनाचा हिस्सा संबंधित ग्रामपंचायतीच्या लोकसंख्या व उत्पन्नाच्या आधारावर संगणकाद्वारे अंतिम करण्यात येणार आहे.

या वेतनप्रणालीमध्ये ग्रामपंचायत, तालुका व जिल्हानिहाय ताळमेळाचे अहवाल संगणकाद्वारे बँकेमार्फत राज्यस्तरीय प्रशासक, राज्य प्रकल्प संचालक, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान, पुणे यांना व जिल्हानिहाय ताळमेळाचा अहवाल संबंधित जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपलब्ध होणार आहे. राज्यस्तरीय प्रशासक म्हणून ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांकडे जबाबदारी राहणार आहे.

पदाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपाला लगामपूर्वी शासनाकडून वेतनासाठी प्राप्त झालेले अनुदान काही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी तात्काळ कर्मचार्‍यांना देण्यास टाळाटाळ करीत होते. कर्मचार्‍यांच्या वेतनाचा निधी पदाधिकारी इतर कामांसाठी खर्च करीत असल्यामुळे कर्मचार्‍यांना वेतनाअभावी हलाखीचे जीवन जगावे लागत होते. आता सरळ बँक खात्यावर कर्मचार्‍यांचे वेतन जमा होणार असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांचा हस्तक्षेप थांबणार असून, मनमानी कारभारावर लगाम लागेल. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची वेतनाअभावी होणारी हेळसांड थांबवून त्यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने बँक खात्यावर जमा करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश गायके, जिल्हाध्यक्ष उमेश जाधव, सचिन नाना इंगळे तसेच इतर कर्मचारी संघटनांची जिल्हा परिषद तसेच ग्रामविकास मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता.            

१ लाख कर्मचार्‍यांना लाभमहाराष्ट्रात जवळपास २७ हजार ७७५ ग्रामपंचायती असून, त्यात  जवळपास १ लाखाच्या वर  कर्मचारी काम करतात. या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, या आदेशावर राज्य शासनाचे सचिव असीम गुप्ता यांची स्वाक्षरी आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMONEYपैसा