शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

आश्रमशाळांमधील १५ हजार कर्मचाऱ्यांचा "जीपीएफ" निघेना, आर्थिकसह मानसिक ताण वाढला

By राम शिनगारे | Updated: April 19, 2024 19:43 IST

अनेक कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नात आर्थिक अडचणी

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक न्याय विभागातून इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे वर्ग केलेल्या ९७७ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील तब्बल १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना पगारासह हक्काचे भविष्य निर्वाह निधीचे (जीपीएफ) पैसे काढता येत नाहीत. त्यासाठी तांत्रिक कारणे देण्यात येत आहेत. मात्र, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न, घर बांधकाम, शिक्षणाचे वांधे झाले आहेत. याविषयी प्रहार शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी संघटनेने विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांना निवेदनाद्वारे तोडगा काढण्याची मागणी केली.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्थापना झाल्यानंतर या विभागाकडे समाजकल्याण विभागातील अनेक शाळांसह आस्थापना वर्ग करण्यात आल्या. वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांचा विभाग बदलल्यामुळे त्यांना जीपीएफसह परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनांचा (डीसीपीएस) नवीन सांकेतांक मिळालेला नाही. हा सांकेतांक मिळाल्यानंतरच संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जीपीएफची रक्कम पाठवता येणार नाही. सध्या लग्नसराई सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या घरी लग्नसमारंभ आयोजित केले जात आहेत. त्या कार्यक्रमांसाठी हक्काचे जीपीएफमधून कर्मचारी पैसे काढत असतात.

मात्र, सध्या जीपीएफसाठी अर्ज केल्यानंतर कोषागार कार्यालयाकडे प्रस्ताव गेल्यावर त्याठिकाणी नवीन सांकेतांक मिळेपर्यंत पैसे मिळणार नसल्याचे स्पष्ट केले जात आहे. प्रहार शिक्षक संघटनेने चार महिन्यांत वेळोवेळी त्याकडे विभागाचे लक्ष वेधले आहे. नुकतेच पुण्यातील विभागाच्या संचालकांना प्रहारचे राज्य समन्वयक विजय धनेश्वर, जिल्हा कार्याध्यक्ष पंकज काळे, पवन डोभाल, गोविंद लहाने, शिवाजी घुगे आदींनी निवेदन देऊन प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

यावेळी जयंती, ईदला वेतन झालेच नाहीआश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. निधी वितरण प्रणाली (बीडीएस) मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण दिले जात आहे. विशेष म्हणजे शासन निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, रमजान ईदनिमित्त आगाऊ वेतन करावे लागते. मात्र, दोन्ही सण होऊन गेले, तरीही वेतन झालेले नाही.

मानसिकसह आर्थिक ताणकर्मचाऱ्यांच्या जीपीएफ, डीसीपीएसचा सांकेतांक हा मंत्रालय पातळीवर दिला जातो. चार महिने उलटले तरी तो अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिकसह आर्थिक ताणातून जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ शिक्षकांच्या मागण्या मंजूर कराव्यात.- विजय धनेश्वर, राज्य समन्वयक, प्रहार शिक्षक संघटना

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTeacherशिक्षक