शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या डिपीआरसाठी ५० कोटी देण्यास शासनाची टाळाटाळ

By बापू सोळुंके | Updated: September 29, 2023 18:36 IST

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर: शहरात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या राज्यमंत्रीमंडळ बैठकीत सिंचनासाठी १४ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची  घोषणा सरकारने केली. दुसरीकडे मात्र, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल  बनविण्यासाइी बंधित विभागाला केवळ  ५० कोटी देण्यास सरकारकडून टाळाटाळ करीत आहे, यावरून मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी जाहिर केलेला निधी हे केवळ थोतांड, असल्याचा घणघणाती आराेप विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

आ. दानवे म्हणाले की, राज्यसरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात नुकतीच एक बैठक आयोजित केली.  मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवू शकत नाही, हे लक्षात येताच राज्यसरकारने  मराठा आरक्षणावर सर्वपक्षिय बैठक बोलावली होती. आता मात्र ओबीसी आरक्षणाच्या बैठकीचे आयोजन करताना राज्यसरकारने मात्र विरोधीपक्षांना विचारलेही नाही. यावरून असे असे दिसते की जेव्हा एखादी समस्या अंगावर येते असे लक्षात येते तेव्हा राज्यसरकार विरोधीपक्षांना सोबत घेत असल्याचे स्पष्ट होते.  मुंबईतील मुलूंड भागात मराठी माणसाला घर देण्यास संबंधित सोसायटीने विरोध केला. गुजरात धार्जिने राज्यसरकारकडून मराठी माणसाला न्याय मिळेल याची खात्री नाही.  यावरुन राज्यातील सामाजिक व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारे जात, धर्म, प्रांत पाहुन घरदार देण्याचा विचार चुकीचा असल्याचे त्यांनी नमूद केले. यापत्रकार परिषदेला शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.

ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग सरकारचे घरगडीकेंद्र आणि राज्यसरकारच्या धोरणाविरोधात जाहिर टीका करणाऱ्या आ.रोहित पवार यांना नुकतीच ईडीने नोटीसा पाठविल्याचे समजले. केंद्रसरकारविरोधात बोलणाऱ्याच्यामागे ईडी, सीबीआय अथवा आयकर विभाग लावा. ईडीच्या नोटीसा पाठविण्याचे आता सर्वश्रुत झाले आहे. यावरुन ईडी, सीबीआय आणि आयकर या संस्था सरकारच्या घरगडी असल्यासारखे काम करीत आहेत. अशाप्रकारे सरकारने ईडी,सीबीआय अथवा आयकर च्या माध्यमातून विरोधकांना नमोहरम करण्याचा प्रयत्न केला तरी, इंडिया आगाडी मजबूत राहिल, असा दावा त्यांनी केला. इंडिया आघाडीमुळे शासन बिथरले असून यातून चुका करू लागल्याचा आरोप आ.दानवेंनी केला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादWaterपाणी