शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी दवाखान्यातील ५० टक्के रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासन माहिती देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 18:06 IST

खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयी-सुविधांचा अभाव यासंदर्भात खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देखासदार जलील यांची जनहित याचिका

औरंगाबाद : खंडपीठाच्या आदेशानुसार सरकारी दवाखान्यातील रिक्त ५० टक्के पदे भरण्यासंदर्भात काय कारवाई केली, याची माहिती सादर करणार असल्याचे सरकारतर्फे निवेदन करण्यात आले.

खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयी-सुविधांचा अभाव यासंदर्भात खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने ७ जून रोजी शासनाला औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्याची प्रक्रिया एका आठवड्यात सुरू करून ६ ते ८ आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात शासनातर्फे वरील प्रमाणे निवेदन करण्यात आले . तसेच वर्ग १ आणि वर्ग २ ची पदे महाराष्ट्र लोकसेवा अयोगामार्फत (एमपीएससी) भरली जातात, असे निदर्शनास आणून दिले असता लोकसेवा आयोगाला प्रतिवादी करण्याची परवानगी खंडपीठाने सोमवारी दिली .

कोविड आणि इतर अनुषंगिक विषयावरील सुनावणीसाठी स्थापन विशेष खंडपीठात या जनहित याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. खासदार जलील यांनी सोमवारी दिवाणी अर्ज दाखल करून औरंगाबाद महापालिकेला प्रतिवादी करण्याची परवानगी मागितली असता खंडपीठाने ती दिली. सुनावणीवेळी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्तिशः बाजू मांडली. राज्य शासनातर्फे ॲड. सुजित कार्लेकर यांनी काम पाहिले.

पुन्हा लोकमतच्या वृत्ताचा संदर्भखासदार जलील यांनी लोकमतमध्ये २५ मे रोजी ‘सुपरस्पेशालिटीत कोट्यवधींची यंत्र सामग्री पडून’ आणि २७ मे रोजी ‘घाटीत सुपर स्पेशालिटीत दीड हजार रुग्णांचे डायलिसिस’' या मथळ्याखाली प्रकाशित बातम्यांचा संदर्भ देत दुसरा दिवाणी अर्ज दाखल करून घाटी दवाखान्यातील सोयी-सुविधांमधील त्रुटींकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. तसेच येथील शासकीय दंत महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याची विनंती केली होती. परंतु खंडपीठाने या आधीच या विषयाची म्युकर्मिओसिस विषयक याचिकेत दखल घेतल्यामुळे जलील यांनी दिवाणी अर्ज मागे घेतला. त्यांना या विषयावर बुधवारी फौजदारी जनहित याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यास खंडपीठाने परवानगी दिली.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय