शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी हॉस्पिटलला दिलेले सरकारी व्हेंटिलेटर परत आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 18:34 IST

अनेक खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याचे कारण पुढे करून रुग्णांना परत पाठविण्याचा प्रकार झाला.

ठळक मुद्दे२६ व्हेंटिलेटरचा ऑगस्टपासून खासगी रुग्णालयांतच वापर

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटती असली तरी शहरातील विविध खासगी रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभागाचे तब्बल २६ व्हेंटिलेटर कार्यरत आहेत. हे व्हेंटिलेटर ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात कधी कार्यान्वित होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे तब्बल २६ व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना देण्यात आले. हा प्रकार ‘लोकमत’ने १० ऑगस्ट रोजी ‘सरकारी व्हेंटिलेटर गेले खासगीमध्ये’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी व्हेंटिलेटर लावलेल्या रुग्णांकडून जर त्याचे पैसे आकारले तर व्हेंटिलेटर प्रशासनाकडून परत घेतले जातील, अशी सूचना केली.खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी होती. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर नसल्याचे कारण पुढे करून रुग्णांना परत पाठविण्याचा प्रकार झाला. या सगळ्यात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाचे २६ व्हेंटिलेटर विविध ७ खासगी रुग्णालयांना देण्यात आले. गेल्या महिनाभरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले की, शहरातील विविध खासगी रुग्णालयांना २६ व्हेंटिलेटर देण्यात आलेले आहेत. यातील एका रुग्णालयाने ५ व्हेंटिलेटर परत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे व्हेंटिलेटर आता परत येतील. 

ग्रामीण भागाकडे दुर्लक्षग्रामीण भागांतील बहुतांश सरकारी रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टरांअभावी व्हेंटिलेटर ठेवणे अवघड आहे. त्यामुळे तेथील व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना देण्यात आले. कन्नड, अजिंठा, सिल्लोड, पाचोड, वैजापूर आदी ठिकणी ऑक्सिजन बेडवरच (ओटू) भर देण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस