शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील एमआयएमच्या तीन गोंधळी नगरसेवकांना थेट शासनाची नोटीस; आठ दिवसात मागितला खुलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 20:15 IST

मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या तीन नगरसेवकांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभुतपूर्व असा गोंधळ घातला होता. तत्कालीन महापौरांच्या अंगावर प्लास्टीकच्या खुर्च्या भिरकावणे, राजदंड पळवून नेणे, सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करणे आदी प्रकार या नगरसेवकांनी केले होते.

ठळक मुद्दे मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या तीन नगरसेवकांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभुतपूर्व असा गोंधळ घातला होता. या गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत शासनाने गुरुवारी तीन्ही नगरसेवकांना नोटीस बजावली

औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या तीन नगरसेवकांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभुतपूर्व असा गोंधळ घातला होता. तत्कालीन महापौरांच्या अंगावर प्लास्टीकच्या खुर्च्या भिरकावणे, राजदंड पळवून नेणे, सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करणे आदी प्रकार या नगरसेवकांनी केले होते. या गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत शासनाने गुरुवारी तीन्ही नगरसेवकांना नोटीस बजावली असून, त्यामध्ये आठ दिवसात खुुलासा सादर करावा अन्यथा नगरसेवकपद रद्द करण्यात येईल, असे म्हटले आहे.

शासनाच्या नगरविकास विभागाने बजावलेल्या नोटीसमुळे एमआयएमच्या गोटाळ एकच खळबळ उडाली आहे. ज्या नगरसेवकांना नोटीस बजावली आहे त्यात सय्यद मतीन (वॉर्ड क्र. २०-जयभीमनगर, घाटी), शेख जफर (वॉर्ड क्र. ६०- इंदिरानगर-उत्तर बायजीपुरा) आणि अपक्ष तथा एमआयएम समर्थक अजीम अहेमद (वॉर्ड क्र. ४३- शरीफ कॉलनी) यांचा समावेश आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये मावळते महापौर बापु घडमोडे यांची शेवटची सुभा सुरू असताना एमआयएम नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. महापौरांसमोरील राजदंड ओढत असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. अजीम अहेमद यांनी सुरक्षा रक्षकाला धक्का देवून खाली पाडले होते. त्यानंतर जफर यांनी थेट महापौरांच्या अंगावर प्लास्टीकच्या खुर्च्या भिरकावल्या होत्या. सय्यद मतीन यांनी राजदंड पळविला होता. या प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. मतीन आणि अजीम यांना सिटीचौक पोलीसांनी अटकही केली होती. गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेश तत्कालीन महापौर घडमोडे यांनी प्रशासनास दिले होते. मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी सभागृहात घडलेल्या घटनांचा सविस्तर तपशील शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केला होता.

नोटीस येताच खळबळगुरूवारी महापालिकेत नियमीत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू असताना शासनाकडून पत्र प्राप्त झाले. मनपा सभागृहात गोंधळ घालणारे सय्यद मतीन, शेख जफर, अजीम अहेमद यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये आठ दिवसांमध्ये खुलासा सादर करावा अन्यथा आपले नगरसेवकपद रद्द का करण्यात येवू नये अशी विचारणाही करण्यात आली आहे. नोटीसमुळे एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आणखी चार जणांचा समावेशमनपा प्रशासनाने शासनाकडे एमआयएमच्या एकूण ८ नगरसेवकांचे अहवाल पाठविले आहेत. यातील काहींनी अतिक्रमण हटावात हस्ताक्षेप केला आहे. अधिका-यांवर हल्ला चढविणे, अतिक्रमण हटविताना विरोध दर्शविणे आदी आरोप एमआयएम नगरसेवकांवर आहेत. त्यातील तीन जणांनाच गुरूवारी शासनाने नोटीस बजावली आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद