शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकार अपयशी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

By बापू सोळुंके | Updated: October 15, 2023 14:18 IST

भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दानवेंनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली, यानंतर घाटी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर सतत घडणाऱ्या अपघातातून राज्य शासनाने कसलाही बोध घेतला नाही, संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराजवळ समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात नसून व्यवस्थात्मक पद्धतीने हत्या आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकार स्पशेल अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

समृद्धी महामार्गावर आज रात्री घडलेल्या भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दानवे यांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली .यानंतर त्यांनी घाटी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या घटनेस परिवहन विभाग जबाबदार असुन १७ जणांची क्षमता असताना ३५ ते ४० प्रवासी या ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास कसा काय करत होते असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बुलढाणा येथे काही महिन्यांपूर्वी असाच मोठा अपघात घडला होता,त्यानंतर या घटनेची तीव्रता लक्षात घेत परिवहन विभागाने समृद्धी वरून जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करणे सुरू केले होते. परंतु लगेच ८ दिवसानंतर पुन्हा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हफ्तेखोरी साठी ही पध्दत बंद पडल्याची टीकाही त्यांनी केली.या अपघातासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारला नागरिकांचे जीव स्वस्त वाटत आहेत का? समृद्धी महामार्गावर सतत लोकांचे बळी जात आहेत. याचे सरकारला गांभीर्य नाही का ? असे हफ्ते खोरीसाठी वाहने थांबवून लोकांचे बळी घेतलेत जात असेल तर ही खूप गंभीर बाब असल्याचे म्हणत दानवे यांनी व्यवस्थापनाच्या गलथान कारभारावर बोट ठेवले. चौकशी झाली पाहिजे दररोजच कोण - कोणत्या गोष्टींवर सरकारचा निषेध करावा. सर्वच बाबतीत सरकारी पातळीवरून असा हलगर्जीपणा होत आहे. तसेच समृद्धी महामार्गाची सुरक्षितता व अत्यावश्यक सुविधा वाढविणे गरजेचे आहे. हा रस्ता जलद प्रवासासाठी आहे तर या वाहनाला का थांबविले गेले? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAmbadas Danweyअंबादास दानवेAccidentअपघात