लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विद्यापीठाने नेमलेल्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असतानाच महाविद्यालयाने उच्च न्यायालयात धाव घेतली. यातच संस्थाचालकाला वाचविण्यासाठी सरकार दरबारातून प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी दुपारनंतर महापौर बापू घडामोडे यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची कार्यालयात बंद दाराआड चर्चा केल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले. याविषयी बोलण्यास कुलगुरूंनी नकार दिला. महापौरांनीही वैयक्तिक कामासाठी कुलगुरूंची भेट घेतल्याचे सांगितले.चौका येथील साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाने एक दिवसापूर्वी झालेल्या पेपरच्या उत्तरपत्रिका दुसऱ्या दिवशी शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी लिहिताना गुन्हे शाखेने परीक्षार्र्थींना अटक केली होती. या प्रकरणामुळे विद्यापीठाची प्रतिमा देशभर मलीन झाली आहे. पोलिसांची चौकशी सुरू असतानाच विद्यापीठानेही डॉ. एम. डी. शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी सुरू केली. या चौकशीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून, या अहवालाच्या आधारे पोलीस विद्यापीठातील काही बड्यांना अटक करण्याची शक्यता आहे. ही कारवाई सुरूअसतानाच विद्यापीठाने संलग्नता रद्द करण्यासाठी महाविद्यालयाला नोटीस पाठविली. या नोटिसीची मुदत संपत आली आहे. तसेच साई महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नयेत, यासाठी विद्यापीठाने राज्य सरकारला पत्रव्यवहार केला. यामुळे धाबे दणाणलेल्या साई अभियांत्रिकीने सर्व कारवाईला स्थगिती मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. यात आगामी सुनावणीपर्यंत विद्यापीठाच्या कारवाईला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. या प्रकरणात विद्यापीठाचा चौकशी अहवाल, न्यायालयाची सुनावणी आणि संलग्नीकरण रद्द करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात चालू आठवड्यात घडामोडी घडणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर काही मंडळी संस्थाचालकाला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच पार्श्वभूमीवर महापौर बापू घडामोडे यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याशी (पान २ वर)
‘साई’ला वाचविण्याचे सरकारी प्रयत्न
By admin | Updated: June 13, 2017 01:05 IST