शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

गोसंवर्धन केंद्राला मूर्तरूप मिळेना

By admin | Updated: August 7, 2014 01:28 IST

कंधार: गऊळ येथे बळीराजाला आर्थिक आधार व्हावा, यासाठी राज्यातील एकमेव लालकंधारी गोवसंवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली़

कंधार: गऊळ येथे बळीराजाला आर्थिक आधार व्हावा, यासाठी राज्यातील एकमेव लालकंधारी गोवसंवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली़ परंतु त्याला अद्याप मूर्तरूप मिळाले नसल्याने मन्याड खोऱ्यासह लगतच्या जिल्ह्यातील बळीराजाची उपेक्षा चालूच असल्याने शेतकरी-पशुपालकांतून संताप व्यक्त केला जात आहे़मन्याड खोऱ्यातील लालकंधारी पशुधन आकाराने बांधेसुद, डौलदार, आकर्षक, मजबूत व देखणे आहे़ चपळ, सालस, हुशार आणि शेतीसाठी उपयुक्त आहेत़ पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथील तत्कालीन अधिष्ठाता गफूर आणि माजी खा़ व आ़ डॉ़ भाई केशवराव धोंडगे यांनी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला़ आणि लालकंधारी जात ही इतर जातीपेक्षा भिन्न असल्याची मान्यता मिळविली़ त्यानंतर या पशुधनाची व्याप्ती वाढावी, पशुपालकांना शेतीसाठी जोडधंदा व्हावा, आर्थिक स्तर वाढावा, यासाठी लालकंधारी गोसंवर्धन केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली़ १९८७ साली गऊळ येथे केंद्र स्थापन करण्यात आले़ लालकंधारी गोसंवर्धन केंद्र हे सतत समस्येचा सामना करत राहिले़ जमिनीचा प्रश्न, वर्ग-३ चे कर्मचारी निवासस्थान, पाणीप्रश्न, खावटी अनुदान आदीमुळे केंद्र व बळीराजा पेचात सापडला़ लालकंधारी पशुधनाचे संगोपन करणाऱ्या बोरी, उमरज, कारतळा, हासूळ, गऊळ, पोखर्णी, पानशेवडी, उमरगा, वाखरड, मसलगा, आंबुलगा, फुलवळ, हरबळ, वहाद, भोजूचीवाडी, घागरदरा, मुंडेवाडी, जांभूळवाडी आदी गावच्या पशुपालकांनी संगोपन केले़ परंतु केंद्राअभावी हाती निराशाच आली़ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेल्या लालकंधारी नर पशुधनाची जोडी ८० ते ९० हजाराला बाजारात विक्री होते़ गायीची प्रजनन क्षमता व दुधासाठी वरदान असलेले पशुधन शासनाच्या उदासीनतेमुळे केंद्राचे स्वरूप बदलले असून नाव सोनूबाई़़़ अशी अवस्था झाली आहे़ केंद्र आता उपचारापुरते उरले आहे़लालकंधारी पशुधनातून शेतीसाठी जोडधंदा तेजीत राहिला असता़ गोवसंवर्धन नसल्याने शेतीचे नुकसान झाले तर आर्थिक उभारी घेता आली असती़ मार्चमध्ये गारपीट झाली़ आता पावसाळा असूनही शिवाराचा उन्हाळा शिल्लक झाला आहे़ (वार्ताहर)१९८८ ला सुरु झाले केंद्रतत्कालीन मुख्यमंत्री कै़शंकरराव चव्हाण यांनी १९८८ ला केंद्राचे उद्घाटन केले़ केंद्राची व्याप्ती गऊळसह, घागरदरा, पानशेवडी, आंबुलगा, कंधारेवाडी, सोमठाणा, सावरगाव, हरबळ होती़ त्यामुळे पशुपालकाच्या आनंदाला पारावार उरला नाही़ आनंदाला आलेली भरती दीर्घकाळ टिकू शकली नाही़ नवीन पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन झाले़ आणि गऊळचे केंद्र गऊळ, भोजूचीवाडी, फुलवळ, मुंडेवाडी, सावरगाव, हरबळ, घागरदरा गावापुरते मर्यादित राहिले़