शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

मोबाइल कंपन्यांचं ‘चांगभलं’; दररोज ‘डेटा’ वापरण्याची सक्तीच; न वापरलेला ‘पॅक’ जातो कुठे?

By संतोष हिरेमठ | Updated: March 18, 2024 15:29 IST

‘माझा डेटा, माझा अधिकार’ नाहीच, मोबाइलचा ‘डेटा’ होतो छुमंतर !

छत्रपती संभाजीनगर : एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतर तिचा वापर कधी करायचा, याचा संपूर्ण अधिकार ग्राहकांना असतो. परंतु मोबाइलचा ‘डेटा’ खरेदी केल्यानंतरही त्यावर ग्राहकांचा म्हणजे मोबाइलधारकांचा अधिकारच नसल्याची परिस्थिती आहे. कारण रिचार्ज मारल्यानंतर दररोज ठरावीक डेटा वापरण्याची जणू सक्तीच होतेय. हा डेटा वापरला नाही तर तोही ‘छुमंतर’ होत असल्याची परिस्थिती आहे.

विविध कंपन्या, खासगी ऑपरेटर्सकडून वेगवेगळ्या रकमेचे रिचार्ज प्लॅन दिले जातात. यात काॅलिंग, एसएमएस आणि ‘डेटा’चा समावेश असतो. दररोज एक जीबी, दीड जीबी, दोन जीबी, अशा प्रकारे ‘डेटा’चा वापर करण्याचे रिचार्ज प्लॅनमध्ये नमूद केलेले असते. यानुसार वापर झाला नाही तर शिल्लक ‘डेटा’ पुढच्या दिवशी, पुढच्या रिचार्जमध्ये समावेश का केला जात नाही, अथवा ग्राहकाला एकाच वेळी महिन्याचा ‘डेटा’ वापरण्याची मुभा का दिली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही कंपन्या शिल्लक ‘डेटा’ आठवड्याच्या शेवटी वापरण्यासाठी देतात, असे एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, आठवड्याच्या शेवटी नाही तर ग्राहकांनी खरेदी केलेला ‘डेटा’ त्यांना कधीही वापरता आला पाहिजे, अशी मागणी पुढे येत आहे.

अशी आहे ‘डेटा’ची स्थिती? एका कंपनीचा २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन दररोज २ जीबी डेटा दिला जातो. त्यासाठी २८ दिवसांची मुदत दिली जाते. यानुसार मोबाइलधारकास ५६ जीबी ‘डेटा’ वापरण्यास मिळतो. पण दररोज २ जीबी ‘डेटा’ यानुसारच वापरण्याची सक्ती केली जाते. अनेक मोबाइलधारकांचा ‘डेटा’ वापर कमी असतो. दररोज वापरण्याच्या अटीने त्यांचा ‘डेटा’ एकप्रकारे गायबच होत असल्याची परिस्थिती आहे. मोबाइलधारकांना ५६ जीबी ‘डेटा’ केव्हाही वापरता आला पाहिजे, त्यांचा शिल्लक ‘डेटा’ पुढे ‘कॅरी फाॅरवर्ड’ झाला पाहिजे, अशी मागणी मोबाइलधारकांकडून होत आहे.

ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेतातशिल्लक ‘डेटा’ पुढे कायम राहावा. एक तर ‘डेटा’चे रेट अवाढव्य आहेत. त्यातही त्याचा वापर झाला तर तो इतरांना विकण्याचाच प्रकार खासगी ऑपरेटर्सकडून होत आहे. ग्राहकांचा उरलेला ‘डेटा’ पुढे कायम राहिला पाहिजे. रोजच्या रोज वापरण्याची सक्ती नसावी. त्याबरोबर रिचार्जचा कालावधी २८, ५६ दिवस असे न राहता पूर्ण महिन्यानुसार असावा. परंतु खासगी ऑपरेटर्स ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन नफा मिळवीत आहेत.- दीपक जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष, नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकाॅम एम्प्लाॅइज, बीएसएनएल

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMobileमोबाइलInternetइंटरनेट