शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
2
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
3
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
4
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
5
IPL 2025 : शाळेत अतिरक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते...
6
क्रेडिट कार्ड की पर्सनल लोन... तुमच्यासाठी कोणता पर्याय फायद्याचा? ही आहे सोपी पद्धत
7
Astro Tips: लक्ष्मीकृपेसाठी शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ 'या' पाचपैकी एक वस्तू ठेवाच!
8
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
9
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर
10
मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."
11
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
12
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
13
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
14
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
15
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
16
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
17
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
18
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
19
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
20
वरमाला पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...

पर्यटकांसाठी खुशखबर! दौलताबादच्या कुशीतील मोमबत्ता तलावात सुरू होणार ‘बोटिंग’

By विजय सरवदे | Updated: November 3, 2023 16:11 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याचा हेतू

छत्रपती संभाजीनगर : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पाऊल पडते पुढे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेने नौकाविहार प्रकल्पाचा संकल्प केला आहे. दौलताबादच्या कुशीत असलेल्या मोमबत्ता तलावात आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून ‘बोटिंग’ सुरू केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले. तसा हा प्रस्ताव मागील ९ वर्षांपासून चर्चेत आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिजित चौधरी, मधुकरराजे आर्दड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वसंत सोळुंके यांनी याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. 

मोमबत्ता तलाव परिसर विकासाचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता. सन २०१५ मध्ये या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी शासनाने सव्वा कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातील ६२ लाख रुपये खर्चून मोमबत्ता तलावाच्या ठिकाणी बोटिंगतळ, खिडकीघर, कॅन्टीन, वाहनतळ, स्वच्छतागृह, पर्यटकांसाठी इतर सुविधांचे कामे करण्यात आली होती. नौकाविहार चालविण्यास देण्यासाठी जिल्हा परिषदेने चार वेळा ई-निविदा काढल्या होत्या. मात्र, एकही सक्षम संस्था पुढे आली नाही. अखेर निधी खर्च न झाल्यामुळे तो शासनाला परत करावा लागला होता. आता तरी हा प्रस्ताव मार्गी लागावा, अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे.

आता विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी पुन्हा या प्रकल्पाला गती दिली आहे. १० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. यावेळी ग्रामीण पर्यटनाला चालना मिळावी, दौलताबाद, वेरुळ, म्हैसमाळ, सुलीभंजन, खुलताबाद येथील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा व परिसर विकासासाठी जिल्हा परिषदेने ३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यापैकी दौलताबाद जवळील मोमबत्ता तलाव परिसर विकासासाठी शासनाने १० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

लवकरच बोटिंगसाठी निविदाप्राप्त निधीतून मोमबत्ता तलाव परिसराचा विकास केला जाईल. या तलावात बोटिंगसोबत घोडेस्वारीचाही आनंद पर्यटकांना घेता येईल. या जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याचा प्रशासनाचा हेतू आहे. यातून ग्रामपंचायतीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. ‘बोटिंग’साठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद