शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांसाठी खुशखबर, नोकर भरतीचा पहिला टप्पा होईना तोच पालिकेचा दुसऱ्याचा प्रस्ताव

By मुजीब देवणीकर | Updated: September 27, 2023 13:49 IST

पहिल्या टप्प्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना मनपाने आणखी २८६ पदे भरण्यासाठी तयारी सुरू केली.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत ११४ पदांच्या नोकर भरतीचा पहिला टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. ९ हजार ८०० विद्यार्थी परीक्षा कधी होईल, याकडे लक्ष ठेवून आहेत. त्यातच मनपा प्रशासनाने भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू केली. २८६ पदे भरण्यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी दिली.

महापालिकेने भरतीसाठी शासन नियुक्त आयपीबीएस कंपनीची निवड केली. या कंपनीमार्फत ११४ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध पदांसाठी ९ हजार ८०० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. लवकरच कंपनीमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना मनपाने आणखी २८६ पदे भरण्यासाठी तयारी सुरू केली. प्रशासक जी. श्रीकांत यांनी पदभरतीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आस्थापना विभागामार्फत वर्ग ३ मधील पदांची भरती केली जाणार असल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बिंदुनामावली मंजूर करून घेण्यात आली. संवर्गनिहाय आणि आरक्षणानुसार पदांची भरती होणार आहे. मनपाने २८६ पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला.अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले की, मनपाने २८६ पदांच्या भरतीची तयारी सुरू केली असून, शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. शासनाकडून मान्यता मिळताच या पदांची भरतीदेखील आयपीबीएस कंपनीमार्फत केली जाणार आहे. आयपीबीएस कंपनीसोबत करार करण्यात आला असून, या कंपनीकडे २८६ पदांचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. कंपनीकडून जाहिरात तयार करून घेण्यात येईल. त्यानंतर जाहिरात काढली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका