शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांसाठी आनंद वार्ता; आजपासून २५ हजारांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 13:06 IST

पतसंस्थेतील सुमारे ३५ हजार ठेवीदारांपैकी २६ हजार ५०० ठेवीदारांची २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत.

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत पैसे अडकलेल्या २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात येणार आहेत. यामुळे जवळपास २७ हजार ठेवीदारांना दिलासा मिळेल.

याबाबत असलेल्या घडामोडीजुलै महिना : दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात आल्या.उपनिबंधक कार्यालय : या कार्यालयाने कर्जवसुली करून ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या प्रक्रियेला दिला वेग.१४ ऑगस्ट : गृहखात्याने मंजुरी देत ५६.१८ कोटींच्या ४६ संपत्तींच्या लिलाव करण्यास सांगितले.कोणाच्या संपत्ती : पतसंस्थेच्या संचालक, व्यवस्थापकांच्या वैयक्तिक नावावर असलेल्या संपत्ती.आता लक्ष : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासाठी प्रक्रिया राबवण्याकडे आता सर्वांचे लक्ष.

७५ टक्के ठेवीदारांना दिलासापतसंस्थेतील सुमारे ३५ हजार ठेवीदारांपैकी २६ हजार ५०० ठेवीदारांची २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत. गुरुवारपासून २५ हजार रुपयांपर्यंत मुदत ठेव, बचत खाते व पिग्मी खाते असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केले जाणार आहे. अशा ठेवीदारांनी तातडीने दोन छायाचित्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचे कागदपत्रे पतसंस्थेच्या एन-६ येथील मुख्य कार्यालयात जमा करण्याचे आवाहन प्रशासक सुरेश काकडे यांनी केले आहे. २० ऑगस्टपर्यंत ५२३ खातेधारकांना २६ लाख ४ हजार ३४३ रुपये परत करण्यात आले आहे. सध्या आदर्शकडे ३ कोटी रुपये जमा असून वसुलीत वाढ होऊन ही रक्कम ४ कोटींपर्यंत जाईल.

लिलाव सप्टेंबरमध्येसंस्थाध्यक्ष, व्यवस्थापक, प्रवर्तक, भागीदार, सदस्य व अन्य व्यक्तींच्या नावे असलेली रक्कम, अन्य मालमत्तांची शासनाकडून जप्ती सुरू आहे. लिलाव प्रक्रियेची मुदत जिल्हाधिकारी व उपनिबंधकांच्या संयुक्त निर्णयानंतर निश्चित होईल. साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या लिलाव प्रक्रियेस प्रारंभ होण्याची शक्यता महसूल अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

ठेवीदारांना पैसे परत देण्यासाठी प्रयत्नशीलठेवीदारांना पतसंस्थेच्या प्रशासकीय पातळीवर पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठेवीदारांनी अधिकाधिक संख्येने त्यांचे कागदपत्रे सादर करावीत. उर्वरित लिलाव प्रक्रिया निश्चित लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. सर्व ठेवीदारांना पैसे परत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

आठ वर्षांतली मानकापेची माया- २०१६ ते २०१९ : १०३ कोटी १६ लाख ७३ हजार ३८१ रुपयांचा घोटाळा.- २०१८ ते २०२३ : ९९ कोटी सात लाख ९० हजार ५७९ रुपयांचा घोटाळा.- २३ हजार ठेवीदार असे आहेत ज्यांच्या ठेवी १५ हजारांपेक्षा कमी आहेत. मात्र, त्यांच्याकडून अत्यल्प प्रतिसाद.- हे मिळून २६ हजार ५०० ठेवीदार असे ज्यांच्या २५ हजारापर्यंत ठेवी आहेत. आता त्यांना पैसे परत मिळतील.

या संपत्तीचा लिलाव होणारमानकापे कुटुंब - ४६ संपत्तीआदर्श ग्रुप - १९ संपत्तीमानकापे व अन्य संचालक -३९ संपत्ती

आव्हान मोठेच तरीही अपेक्षा-२८७,७६,६९,३२५ फसवणुकीची रक्कम.-अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ मिळून २१ मुख्य आरोपी. ६ गुन्ह्यांमध्ये एकूण ११२ आरोपी.-९२,१६४ एकूण ठेवीदार.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbankबँक