शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर ! अजिंठा लेणी आता शनिवार- रविवार सुद्धा पाहता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 18:07 IST

Tourism in Aurangabad : जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शनिवारी सुधारित आदेश काढून पर्यटनस्थळे पूर्वीप्रमाणे  नियमित वेळेत सुरु ठेवण्याची सूचना भारतीय पुरातत्त्व विभागाला केली आहे.

ठळक मुद्देसुधारित आदेशाची उद्यापासून होणार अंमलबजावणीपूर्वीप्रमाणे सोमवारी असणार लेणी बंद

सोयगाव ( औरंगाबाद )  : अजिंठालेणी ( Ajanta Caves) आता शनिवार-रविवार सुद्धा पर्यटकांसाठी खूली राहणार आहे. तर पूर्वीप्रमाणे सोमवारी लेणी बंद राहणार आहे. मंगळवार ते रविवार लेणी पूर्वीप्रमाणे सुरु राहणार असल्यामुळे मागील दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या पर्यटन व्यावसायिकांना ( Tourism in Aurangabad ) मोठा दिलासा मिळणार आहे. 

ब्रेक- दि- चेन अंतर्गत अजिंठा लेणी सोमवार ते शुक्रवार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, शनिवार- रविवार या सुटीच्या दिवशी लेणी बंद राहत असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असे, तसेच या दोन दिवसात लेणीस भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पर्यटक कमी येत असल्याने पर्यटन व्यवसायाचे अर्थचक्र डबघाईस आल्याचे दिसून येत होते. दरम्यान, राज्य शासनाने ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर शनिवार व रविवार या दोन दिवशी पर्यटनस्थळे पूर्ववत सुरु करण्याची मागणी पर्यटन व्यावसायिकांनी केली. 

यावर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शनिवारी सुधारित आदेश काढून पर्यटनस्थळे पूर्वीप्रमाणे  नियमित वेळेत सुरु ठेवण्याची सूचना भारतीय पुरातत्त्व विभागाला केली आहे. या पार्श्वभूमीवर आता अजिंठालेणी मंगळवार ते रविवार पूर्वीप्रमाणे नियमित वेळेत सुरु राहणार आहे. नियमांनुसार दर सोमवारी लेणी पूर्वीप्रमाणे बंद असेल.  जिल्हाधिकाऱ्याच्या या निर्णयानंतर पर्यटन व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रविवारपासून  ( दि.१० ) या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन