शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर तालुक्यात वाळूमाफियांना ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:35 IST

तालुक्यातील धामोरी -शेंदुरवादा परिसरात मातीमिश्रित वाळूची सर्रास लूट केली जात असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : तालुक्यातील धामोरी -शेंदुरवादा परिसरात मातीमिश्रित वाळूची सर्रास लूट केली जात असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.नाममात्र मातीमिश्रीत वाळू परवानगीच्या नावाखाली शेकडो हायवा ट्रक परवानगीपेक्षा जास्त वाळू भरून वाहतूक करीत आहेत. या वाहनांमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. प्रशासनातर्फे मातीमिश्रीत वाळूचा ५०० ब्रास वाळूचा ठेका देण्यात आला होता. असाच प्रकार पेंडापूर शिवारातही झाला होता. वाळू माफिया व महसूल विभागाच्या या ‘सोयरिकी’मुळे हजारो ब्रास वाळू उपसा करून नदी पात्रात मोठमोठे खड्डे केले आहेत. यामुळे शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.विशेष म्हणजे अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान घरकुल योजनेसाठी लाभधारकांना घर बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू देण्याची घोषणा केली आहे, या घोषणेमुळे वाळूमाफियांचे चांगले फावले आहे. तालुक्यातील खांब नदीवरील शेंदूरवादा तर शिवना नदीवरील काटेपिंपळगाव, कोबापूर, वाघलगाव, झोडगाव, भालगाव, पेंडापूर, कनकोरी, बोलेगाव, पुरी, पाखोरा, नंद्राबाद या ठिकाणी पाण्याविना उघड्या पडलेल्या नदीपात्रातून जेसीबीच्या साह्याने उत्खनन करून हजारो ब्रास वाळू सर्रास वाहतूक केली जात आहे. गोदावरी नदीचे पाणी आता कमी झाले आहे. त्यामुळे नेवरगाव परिसरातील संकटेश्वर मंदिर या ठिकाणी वाळू तस्करांनी आपला मोर्चा वळविला आहे. कुंपणच शेत खात असल्याने तक्रार तरी करावी कोणाकडे, अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागriverनदी