शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोने विकून कर्ज फेडले, ४० लाखांच्या सोन्याचा अपहार करणारा सुवर्ण कारागीर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 14:26 IST

१९९४ पासून आरोपी अमरचंद या व्यवसायात आला. तेव्हापासून तक्रारदार हे त्यास विश्वासाने सोन्याची लगड देत आणि त्याच्याकडून दागिने तयार करून घेत.

ठळक मुद्देक्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल ८४५ ग्रॅम ९०० मिली ग्रॅम सोने हडपले

औरंगाबाद : श्रीनिकेतन कॉलनीतील मे. लालचंद मंगलदास सोनी जेम्स ॲण्ड ज्वेलर्स प्रा.लि.(एलएमएस) या सुवर्णपेढीच्या कारागिराने विश्वासघात करून तब्बल ४० लाख १८ हजार रुपये किमतीच्या सोन्याचा अपहार केल्याचे समाेर आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून क्रांती चौक पोलिसांनी त्यास अटक केली.

अमरचंद प्रेमचंद सोनी (रा. पानदरीबा), असे अटकेतील कारागिराचे नाव आहे. क्रांती चौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार उदय हरिदास सोनी (रा. समर्थनगर) यांची वडिलोपार्जित सुवर्णपेढी आहे. आरोपीचे वडील हे त्यांच्या दुकानात सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करीत. १९९४ पासून आरोपी अमरचंद या व्यवसायात आला. तेव्हापासून तक्रारदार हे त्यास विश्वासाने सोन्याची लगड देत आणि त्याच्याकडून दागिने तयार करून घेत. काही वेळा निम्म्याच सोन्याचे दागिने तयार होत. अलंकार घडविण्याची मजुरी त्यांना ते देत. अशाप्रकारे त्यांचा व्यवहार होत. १ एप्रिल २०२० पासून त्यांच्यातील व्यवहाराचा हिशेब झाला नव्हता. मार्च महिन्यात तक्रारदार यांनी आरोपी अमरचंद याला कॉल करून सोन्याचा हिशेब करू, असे सांगितले. तेव्हा तो राजस्थानला असल्याचे आणि तेथून आल्यावर हिशेब करू असे म्हणाला. मे महिन्यात पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला तेव्हाही तो राजस्थानमध्येच असल्याचे म्हणाला. 

यानंतर तक्रारदार यांनी केलेल्या हिशेबानुसार १ एप्रिल २०२० ते ४ जून २०२१ या कालावधीत त्यांच्या पेढीने अमरचंदला दागिने घडविण्यासाठी ३ किलो २७९ ग्रॅम ४९० मिलिग्रॅम सोन्याची लगड दिली. यापैकी त्याने २ किलो ४३३ ग्रॅम ५९० मिलिग्रॅमचे दागिने तयार करून दिले. त्याच्याकडे ४० लाख १८ हजार रुपये किमतीचे ८४५ ग्रॅम ९०० मिलिग्रॅम सोने शिल्लक असल्याचे समजले. आठ दिवसांपूर्वी आरोपी औरंगाबादला आल्यावर तक्रारदार यांनी त्यांना हिशेब विचारला असता त्याच्याकडे सोने नसल्याचे म्हणाला.

कर्जबाजारी झाल्याने सोने विकल्याची कबुलीतक्रारदार यांनी आरोपीला सोन्याचे दागिने अथवा लगड परत करण्यास सांगितले असता त्याने तो कर्जबाजारी झाल्याचे नमूद केले. तक्रारदार यांचे सोने विकून लोकांची देणी दिल्याची कबुली त्याने दिली. तुमचे साेने अथवा त्याची रक्कम सध्या तो देण्यास असमर्थ असल्याचे म्हणाला. आरोपीने विश्वासघात करून ४० लाख १८ हजार रुपयांच्या सोन्याचा अपहार केल्याची तक्रार मंगळवारी क्रांती चौक ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संदीप शिंदे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद