शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’, ‘क्रेडिट’ कार्डपेक्षा पाकिटात आरोग्याचे गोल्डन, आभा कार्डच अधिक, पण वापर कधी?

By संतोष हिरेमठ | Updated: December 27, 2024 20:20 IST

आरोग्याचे कार्ड कशासाठी? रुग्णालयात ‘गोल्डन कार्ड’, ‘आभा’ कार्ड कोण विचारतेय?

छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्य नागरिकांच्या खिशात ‘एटीएम’ ‘क्रेडिट’ कार्डपेक्षा आरोग्य योजनांच्या कार्डची संख्या वाढली आहे. परंतु, या आरोग्य कार्डचा वापरच करता येत नसल्याची स्थिती आहे. रुग्णालयांमध्ये गेल्यानंतर आयुष्यमान योजनेचे ‘गोल्डन कार्ड’ आणि ‘आभा‘ कार्ड आहे का, अशी कुणाकडून साधी विचारणाही होत नाही. त्यामुळे कार्डचा उपयोग नेमका काय आहे, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत, यासाठी केंद्र शासनाकडून 'आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबविली जात आहे. योजनेसाठी नागरिकांना आयुष्यमान योजनेचे गोल्डन कार्ड देण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात. मात्र, आजघडीला ‘गोल्डन कार्ड’ची रुग्णालयात विचारणाच केली जात नसल्याची स्थिती आहे.

आरोग्याची कुंडलीआभा हेल्थ कार्ड ही एकप्रकारे रुग्णांच्या आरोग्याची कुंडली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. कारण या कार्डमध्ये रुग्णाच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते. या कार्डच्या मदतीने डॉक्टर रुग्णाच्या संपूर्ण आरोग्याच्या माहिती मिळवू शकतात. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज मिळवता येतो. परंतु, आजघडीला खासगी रुग्णालयांत या कार्डची विचारणाच होत नसल्याची परिस्थिती आहे.

कार्ड नाही, पण ॲपवर नोंदणीजिल्हा सामान्य रुग्णालयातही आभा कार्ड आहे का, अशी कुणाकडून विचारणा होत नाही. परंतु, रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच ‘आभा‘ ॲपच्या मदतीने ओपीडीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे आभा कार्ड नाही, अशांनाही या ॲपच्या मदतीने ऑनलाइन पद्धतीने ओपीडीसाठी नोंदणी करता येत आहे. या ॲपवरच डाॅक्टरांनी दिलेली औषधीही पाहता येतात.

आरोग्य विभागाच्या रुग्णालयांपुरतेच मर्यादितआभा कार्ड हे फक्त सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयांपुरतेच मर्यादित राहात आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या घाटी रुग्णालयातही या कार्डची विचारणा होत नाही.

पुढच्या टप्प्यात खासगी रुग्णालयांत वापरसध्या आभा कार्डचा वापर हा केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये होत आहे. त्यातून रुग्णांच्या आजाराची माहिती, घेतलेला उपचार आदींची माहिती मिळते. पुढच्या टप्प्यात खासगी रुग्णालयांतही आभा कार्डचा वापर होईल, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य