शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पैठणचा गोदाकाठ ११ हजार दिव्यांनी उजळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:26 IST

गोदावरी प्रकट दिनाच्या मुहूर्तावर शनिवारी राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने पैठण येथील गोदावरीच्या नाथ घाटावर ११ हजार दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी पैठणनगरीत एकच गर्दी केली होती.

पैठण : गोदावरी प्रकट दिनाच्या मुहूर्तावर शनिवारी राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने पैठण येथील गोदावरीच्या नाथ घाटावर ११ हजार दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी पैठणनगरीत एकच गर्दी केली होती.याप्रसंगी आ. संदीपान भुमरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या हस्ते गोदावरीची पूजा करून खण-नारळाने ओटी भरण्यात आली. गोदावरीचा प्रकट दिन माघ शुद्ध दशमीच्या मुहूर्तावर साजरा करण्यात आला. दैनिक वीणेकरी भक्त संघटना व दैनिक गोदावरी आरती भक्तमंडळाच्या वतीने गोदावरी पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. महेश शिवपुरी यांच्या मंत्रघोषात दादा तांगडे, शंकर थोरात, दगडूनरके, सजन मुळे, सावळाराम लोहकरे, एकनाथ सोनवणे, ज्ञानेश्वर मुंडे, हरिभाऊ भुकेले, बालासाहेब थोरात, रामराव पठाडे, ज्ञानेश्वर वाघ, दगडू नजन, तुकाराम कर्डिले, कडूजन गाडेकर, बाबुराव ढवळे, पुष्पा गव्हाणे, छाया देशपांडे, जयश्री कावसानकर, सुलोचना दानशूर, कीर्ती शिवपुरी, मनीषा कुलकर्णी, ललिता खिस्ती, प्राची कावसानकर, जयश्री भावसार, सुनंदा वैष्णव, चंद्रकला जानकर, अनसूया सोनवणे, सुरेश अंबाडे, तुकाराम पोकळे, अण्णासाहेब डाके यांच्यासह अनेकांनी गोदावरी मातेची पूजा केली.याप्रसंगी बंडेराव जोशी, दिनेश पारीख आदींची प्रवचने झाली. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. तत्पूर्वी गोदावरी प्रकट दिनानिमित्त पहाटेपासूनच गोदावरीत स्नान करण्यासाठी भाविक वर्ग लोटला होता. श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकºयांनी प्रकट दिनानिमित्त गोदावरी मातेचे पूजन करून ओटी भरली. पहाटे गागाभट्ट चौकातील प्राचीन तथा ऐतिहासिक गंगामंदिरामध्ये गंगामूर्तीचाही महाभिषेक पुजारी प्रदीप महेशपाठक व सुयश शिवपुरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.याप्रसंगी बालवारकºयांसह भक्तांनी भावगीते, अभंग व भजने गाऊन गंगामंदिर दुमदुमून टाकले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश पाठक, स्वप्नील पिंपळकर, एकनाथ धूत, किरण भावसार, दीपक लिंबोरे, तुकाराम लिंबोरे, रामभाऊ जमादार, भीमसिंग बुंदिले, विष्णू ढवळे, जगन्नाथ जमादार, राजेंद्र पाठक, रवींद्र पांडव, रमेश जाधव, शुभम् जगताप आदींनी परिश्रम घेतले.गोदाकाठी भक्तांचा मेळागोदावरीचे मुखस्थान म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीची प्रकट दिनानिमित्त हजारो भाविकांनी दिवसभर पवित्र स्नान करून गोदापात्रात पुष्प अर्पण करून दीप दान केले. दरम्यान, दीप प्रज्वलनप्रसंगी समाजभान प्रतिष्ठानचे धोंडिभाऊ पुजारी, पोनि. चंदन इमले, नगराध्यक्ष सूरज लोळगे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, नगरसेवक तुषार पाटील, स्वच्छता सभापती ईश्वर दगडे, अश्विनी लखमले, सरपंच साईनाथ सोलाट, शेखर शिंदे, राणा मापारी, सचिन उंडाळे, शिवा भाग्यवंत, शिवा पारिख, कैलास बरकसे, मंगेश कुलकर्णी, योगराज बुंदिले, शिवाजी पठाडे यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती.पैठणच्या गोदामातेचे वैशिष्ट्यसंत एकनाथ महाराज व संत अमृतरायांनी गोदावरीच्या जलात जिवंत समाधी घेतली आहे. श्रीखंड्या या नावाने भगवान श्रीकृष्ण नाथांच्या घरी अन्नदानासाठी दररोज कावडीने रांजणात पाणी भरीत व गोदावरीवर स्नान करण्याचा आनंद लुटत. गोदावरी माता स्त्री रूपात नाथांचे कीर्तन ऐकण्यासाठी अधून-मधून नाथवाड्यावर हजेरी लावत. पैठणला गोदावरी दक्षिणवाहिनी प्रवाहित झाल्यामुळे तिचे विशेष असे महत्त्व आहे. तसेच ‘गोदावरीत स्नान केल्यामुळे पापमुक्त होतो’ अशी धारणा असल्याने लोक स्नानासाठी गर्दी करतात.