शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोदेने पात्र सोडले; वैजापूर, गंगापूर तालुक्यात महापुराची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:16 IST

वहन क्षमता सव्वालाख, आवक ३ लाख क्युसेक

ठळक मुद्दे: वैजापूर, गंगापुरातील गावांना बसणार फटका; प्रशासनाची कसोटी

पैठण (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने गोदावरी पात्रात होणारा विसर्ग रविवारी २ लाख ६२ हजार १५० क्युसेक, अशा मोठ्या क्षमतेने वाढविण्यात आला.  गोदावरी पात्राची वहन क्षमता सरासरी १ लाख २५ हजार क्युसेक आहे. त्यामुळे सध्या गोदावरीत महापूरजन्य परिस्थिती असून, अनेक ठिकाणी नदी पात्र सोडून वाहत आहे. वैजापूर, गंगापूर तालुक्यांतील गोदावरी काठावरील गावांना याचा फटका बसणार आहे. सोमवारी अधिक गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार असल्याने प्रशासाची  कसोटी लागणार आहे.

रविवारी सकाळी जायकवाडी धरणात ७५,४१६ क्युसेक क्षमतेने आवक होत होती. धरणात येणारी आवक तासातासाला वाढत असल्याने सोमवारपासून धरणात जवळपास दीड ते दोन लाख क्युसेक आवक अपेक्षित असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी धरणात १८% जलसाठा झाला होता. सोमवारी सकाळपर्यंत २५% जलसाठा होण्याची अपेक्षा आहे. शनिवारी नाशिक जिल्ह्यातील करंजवन ४८ मि.मी., वाघाड ७८ मि.मी., ओझरखेड ४० मि.मी., पालखेड ४१ मि.मी., गंगापूर १९५ मि.मी., गौतमी १५० मि.मी., कश्यपी १३३ मि.मी.,  कडवा ८५ मि.मी., दारणा ८७ मि.मी., भावली २३३ मि.मी., मुकणे ७३ मि.मी., नाशिक ९५ मि.मी., त्र्यंबकेश्वर ३१५ मि.मी., इगतपुरी २२० मि.मी., घोटी १४२ मि.मी. अशा जबरदस्त पावसाची नोंद झाली.  रविवारी सकाळपासून पुन्हा  नाशिक जिल्ह्यात  पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तेथील धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील दारणा धरणातून ३९,२५० क्युसेक, कडवा धरणातून १६,२२० क्युसेक व गंगापूर धरणातून ४५,४८६ क्युसेक, पालखेड धरणातून ५७,७०६ क्युसेक, विसर्ग रविवारी दुपारपासून वाढविण्यात आला. 

या सर्व धरणांचे पाणी नांदूर-मधमेश्वर वेअरमध्ये येत असल्याने, नांदूर-मधमेश्वर वेअरमधून रविवारी दुपारी ३ वाजता २ लाख क्युसेक क्षमतने गोदावरी पात्रात विसर्ग वाढविण्यात आला. गोदावरी पात्राची वहन क्षमता सरासरी १,२५,००० क्युसेकची असून, क्षमतेपेक्षा जास्त विसर्ग वाढविण्यात आल्याने महापुराचे पाणी पात्राबाहेर पसरले आहे. गोदावरीच्या पुराचा फटका नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यांतील अनेक गावांना बसला आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता धरणाची पाणीपातळी १,५०१.५९ फूट झाली होती, तर धरणात १,१०९.२६७ दलघमी (३९.१६ टीएमसी) एकूण जलसाठा झाला असून, यापैकी ३७१.१६१ दलघमी (१३.१० टीएमसी ) जिवंत जलसाठा झाला आहे. धरणात रविवारी सायंकाळी १८% जलसाठा झाला होता. 

अहमदनगर जिल्ह्यातील विसर्ग जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात गत आठवड्यापासून जोरदार पाऊस होत आहे. नगर जिल्ह्यातील धरणाचा जलसाठा चांगला झाल्याने तेथील धरणातून आज मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. भंडारदरा धरणातून निळवंडेत २१,३५७ क्युसेक असा विसर्ग होत असून, ओझर वेअरमधून प्रवरेच्या पात्रात २,१२१ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. शनिवारी भंडारदरा १६० मि.मी., निळवंडे ३५ मि.मी., वाकी १९८ मि.मी., अशा पावसाची नोंद झाली. पाऊस झाल्यामुळे सोमवारी सकाळी प्रवरेच्या पात्रात २० ते २५ हजार क्युसेक असा विसर्ग करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. हे पाणीसुद्धा लवकरच जायकवाडीत दाखल होईल. जायकवाडी धरणात यंदा ६०६.७२ दलघमी  (२१.४२ टीएमसी) पाण्याची आवक झाली आहे. गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणीपातळीत २.३४ फुटांनी वाढ झाली असून, जलसाठ्यात ७% वाढ झाली आहे.

जायकवाडी प्रशासन सतर्कजायकवाडी धरणात येणारी मोठी आवक व जलसाठ्यात झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता जायकवाडी प्रशासन सतर्क झाले आहे. जायकवाडीच्या धरण नियंत्रण कक्षात पुरेसे अभियंते, कर्मचारी, नियुक्त करण्यात आले असून, वायरलेस कक्ष, दूरध्वनी आदी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, तसेच वरिष्ठांना धरणाचे अपडेट देण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, सहायक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील धरणाचा जलसाठाकरंजवण    -    ७६.०१%वाघाड    -    १००% ओझरखेड    -    २४.४५%पालखेड    -     ७०.४१%गंगापूर    -    ८८.१०% गौतमी    -    ९८.८९%कश्यपी    -    ९५.४१%कडवा    -    ८५.९५% दारणा    -    ८८.४०%भावली    -    १००%मुकणे    -     ९४.००%

अहमदनगर जिल्ह्यातील जलसाठाभंडारदरा    -    ९५.०६%निळवंडे    -    ६०.९८%मुळा    -    ५५.३३%वालदेवी    -    १००%आढळा    -    १००%

टॅग्स :floodपूरgodavariगोदावरीAurangabadऔरंगाबादRainपाऊस