शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वर चराचरात आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:18 IST

नरेंद्रचार्य महाराज : सिल्लोडमध्ये भक्तसागर लोटला; दर्शनासाठी गर्दी

सिल्लोड : ईश्वर चराचरात आहे. माणसाच्या सत्कर्माने त्याला देवपण प्राप्त करता येऊ शकते, यासाठी त्याचे कर्म महत्त्वाचे आहे. आपण जगत असताना दुसऱ्याला जगायला मदत करणे, हीच खरी मानवता आहे. त्यामुळे प्रत्येकाने चांगले कर्म करणे गरजेचे आहे, असा उपदेश जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज (नाणिज धाम) यांनी येथे केले. महाराजांच्या दर्शनासाठी सिल्लोडमध्ये भक्तसागर लोटला होता.बुधवारी शहरातील भराडी रस्त्यालगत स्व. गोकुळचंद खिंवसरा सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कीर्तन, प्रवचन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी आयोजक राजेश खिंवसरा व त्यांच्या कुंटुबियांच्या वतीने महाराजांचे पाद्यपूजन करण्यात आले.  तुम्ही बुध्दीचा कसा वापर करता, यावर त्याचे फलीत अवलंबून आहे. देवादिकांना देखील चुकीने केलेल्या गोष्टीचे प्रायश्चित भोगावे लागले असेल तर तुम्ही आम्ही कोण, माणसाचे शरीर हे नश्वर असून आत्मा अमर आहे. त्यामुळे मोह माया याचा त्याग केला तरच तुम्ही ईश्वरप्राप्ती करु शकता, असा उपदेश महाराजांनी केला.सुमारे अडीच तास केलेल्या उपदेशात जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांनी आपला श्री संप्रदाय हा परिवार असून भक्ताने दिलेल्या हाकेला धाऊन जातो, असे सांगत सच्चा मनाने हाक द्या, मी धाऊन येईल, असे सांगितले. महाराजांच्या दर्शन व प्रवचन सोहळयास लाखो भाविक विशेषत: महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नरेंद्रचार्य महारांजाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक