शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दमणगंगेचे पाणी गुजरातला न देता मराठवाड्याला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 13:51 IST

दमणगंगा, नार-पार, तापी या पश्चिमी वाहिन्यांतील नदी खोऱ्यांचे पाणी गुजरातला देण्याच्या हालचाली

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमी प्रमाणात पाऊस होत आहे. राज्य सरकार पश्चिमी वाहिन्यांतील पाणी गुजरातला देण्यासाठी तयार झाले

औरंगाबाद : दमणगंगा, नार-पार, तापी या पश्चिमी वाहिन्यांतील नदी खोऱ्यांचे पाणी गुजरातला देण्याच्या हालचाली सुरू असून, ते पाणी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मिळावे, अशी मागणी पाणी यात्रा या एनजीओचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. नितीन भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद नदी खोऱ्यात पाणी सोडण्यावरून अनेकदा वाद होतात. पाण्याचा राजकीय दुष्काळ आहे, पाण्याचा दुष्काळ नाही; परंतु नियोजन नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. १९९९ साली चितळे समितीने दिलेल्या अहवालानुसार नाशिकच्या पश्चिमेकडील पाणी समुद्रात वाहून जाते. ते पाणी उचलून वळण बांधाऱ्यांमार्फत कायमस्वरूपी गोदावरीपात्रात आणले जावे. काही वर्षांपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमी प्रमाणात पाऊस होत आहे. असे असताना राज्य सरकार पश्चिमी वाहिन्यांतील पाणी गुजरातला देण्यासाठी तयार झाले आहे. गुजरातला पाणी वळविल्यास केंद्र शासनाकडून राज्याला निधी मिळेल; परंतु निधी दिल्यानंतर गुजरातला पाणी वळविण्याच्या करारानुसार दमणगंगेचे पाणी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वळविणे शासनाला शक्य होणार नाही. 

मे २०१० मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पश्चिमी वाहिन्यांचे पाणी गुजरातला देण्याबाबत सामंजस्य कराराच्या हालचाली सुरू केल्या. त्याआधारेच विद्यमान सरकार पुढे जात आहे. हा सगळा प्रकार विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांसमोर मांडला होता काय? तर त्याचे उत्तर नाही आहे. दोन विभागातील सुमारे ५ कोटी लोकसंख्येला फसविण्याचा, अंधारात ठेवण्याचा हा प्रकार आहे. पाणी वाटप लवादांसमोर देखीलही बाब आणली नसल्याचे पत्रकार परिषदेत भोसले यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. प्रदीप देशमुख, महेंद्र ज्ञाते, शाहू भोसले यांची उपस्थिती होती. 

दोन्ही विभाग पिंजून काढणार ४४६ टीएमसी पाणी गुजरातला आणि १६ टीएमसी पाणी मुंबईला देण्याचा करार होऊ नये, यासाठी जनआंदोलन झाले पाहिजे. जनता आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे या विरोधात लढा दिला पाहिजे. यासाठी पाणी यात्रा ही संस्था औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जळगाव, धुळे, नाशिकमध्यै दौरा करून आंदोलनाची दिशा ठरवीत आहे.  

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकार