परभणी: शिवसेनेच्या केंद्रीय पथकाने परभणी जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करुन खा. हेमंत गोडसे व खा.बंडू जाधव यांच्या पथकाने पाण्याअभावी वाळून गेलेले पीक जिल्हाधिकाऱ्यांसमोर मंगळवारी ठेवून आणेवारी काढून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या.यावेळी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ.संजय कच्छवे, आ.मीराताई रेंगे, हनुमंतराव पौळ, शिवाजी खंडागळे, तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे, बाळासाहेब राखे, प्रल्हाद गिराम, मुंजाभाऊ गिराम, सूर्यकांत नाईकवाडे, बाबासाहेब धर्मे, विठ्ठल धर्मे, सुरेश कोरडे आदींची उपस्थिती होती.२५ आॅगस्टपासून दुष्काळाची पाहणी करण्यासाठी खा.हेमंत गोडसे व खा.बंडू जाधव यांनी जिल्हादौऱ्यास सुरुवात केली. गंगाखेड, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील गावांना भेटून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ.संजय कच्छवे, कल्याणराव रेंगे, सुरेश ढगे, तालुकाप्रमुख रविंद्र धर्मे, रंगनाथ रोडे, बाळासाहेब आरबाड, रामचंद्र आम्ले यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
आणेवारी काढून शेतकऱ्यांना मदत द्या
By admin | Updated: August 26, 2014 23:55 IST