शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'कोविड भत्ता द्या, अन्यथा ड्युटी करणार नाही'; घाटी रुग्णालयात इंटर्न डॉक्टरांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 19:42 IST

घाटीत १४४ इंटर्न डॉक्टरांची (आंतरवासिता) बुधवारपासून ड्युटी लावण्यात आली. त्यांना ११ हजार रुपये मानधन दिले जाते.

औरंगाबाद : कोविड भत्ता देण्याच्या मागणीसाठी इंटर्न डॉक्टरांनी दिलेल्या विविध घोषणांनी बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसर दणाणून गेला. ५० हजार रुपये विद्यावेतन देण्यासह अन्य मागण्यांसाठी इंटर्न डॉक्टरांनी आंदोलन सुरू करत कोविड वाॅर्डात रुजू होण्यास नकार दिला.

घाटीत १४४ इंटर्न डॉक्टरांची (आंतरवासिता) बुधवारपासून ड्युटी लावण्यात आली. त्यांना ११ हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु, हे मानधन अत्यंत कमी असल्याने इंटर्न डॉक्टरांनी सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलन सुरू केले. मुंबई महापालिकेने तेथील इंटर्न डॉक्टरांना दरमहा ५० हजार रुपये कोरोना मानधन दिले. ११ हजार रुपये इतक्या विद्यावेतनाशिवाय हा अतिरिक्त कोरोना भत्ता देण्यात आला. याच धर्तीवर घाटीतील इंटर्न डॉक्टरांनी ५० हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली आहे. त्याबरोबर इंटर्न डॉक्टरांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे आणि कोविड ड्युटीदरम्यान राहण्याची आणि त्यानंतर क्वाॅरंटाईनची व्यवस्था करावी. आजारी पडल्यास उपचारांची जबाबदारीही शासनाने उचलावी, अशी मागणी करण्यात आली.

वर्षभरापासून मागणीगेल्या वर्षभरापासून वरिष्ठ इंटर्न डॉक्टरांकडून मागणी केली जात होती. आता लेखी स्वरुपात आश्वासन जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत रूजू होणार नाही, असे नव्याने रूजू होणाऱ्या इंटर्न डॉक्टरांनी सांगितले. कोरोना काळात रुग्णसेवेत इंटर्न डॉक्टरांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. परंतु, आंदोलनामुळे जवळपास १४४ इंटर्न डॉक्टर सायंकाळी रूजू झालेले नव्हते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर