शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकर लग्नास तयार झाल्याने प्रेयसीने घेतली बलात्काराची तक्रार मागे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 18:06 IST

प्रियकर लग्नाला तयार झाल्याने त्याच्याविरोधात चार दिवसापूर्वी नोंदविलेली बलात्काराची फिर्याद ३६ वर्षीय महिलेने  मंगळवारी मागे घेतली.

ठळक मुद्देवैजापुर तालुक्यातील रहिवासी  २४ वर्षीय सुनील (नाव काल्पनिक) हा एका ट्रकवर क्लीनर म्हणून काम करतो. औरंगाबादेतील रहिवासी ३६ वर्षीय सुनीता ही घरातच टेललिंगचे काम करते.

औरंगाबाद : प्रियकर लग्नाला तयार झाल्याने त्याच्याविरोधात चार दिवसापूर्वी नोंदविलेली बलात्काराची फिर्याद ३६ वर्षीय महिलेने  मंगळवारी मागे घेतली. गैरसमजुतीने आपण ही तक्रार नोंदविल्याचा जबाब पोलिसांकडे नोंदविला. दरम्यान,  जेलमध्ये जाण्यापेक्षा लग्नाच्या बंधनात अडकणे तरूणाने पसंत केल्याने हे सर्व घडल्याचे समोर आले.

वैजापुर तालुक्यातील रहिवासी  २४ वर्षीय सुनील (नाव काल्पनिक) हा एका ट्रकवर क्लीनर म्हणून काम करतो. औरंगाबादेतील रहिवासी ३६ वर्षीय सुनीता ही घरातच टेललिंगचे काम करते. मोबाईलच्या एका मिस्ड कॉल मुळे त्यांच्यात ओळख झाली. नंतर दोघेही वॉट्सअप आणि फेसबुक या सोशल मीडियावर आपसात चॅटींग करू लागले. चॅटींग दरम्यान दोघेही अविवाहित असल्याचे त्यांनी परस्परांना सांगितले. शिवाय त्याने तो बडोदा बँकेत नोकरी करीत असल्याचे सांगितले. तर तिनेही तिचे काम लपवून नोकरी करीत असल्याचे म्हणाली. 

दोघांमध्ये रोज संवाद होत असत. चॅटींग करता-करता उभयतांनी त्यांचे ऐकमेकांवर प्रेम असल्याचे नमूद केले. नंतर दोघांनी भेटायचं ठरवल आणि तो १५ एप्रिल रोजी औरंगाबादेत आला. त्याची प्रतिक्षा करीत ती आधीच मध्यवर्ती बसस्थानकावर गेली होती. तेथे प्रथमच दोघांनी ऐकमेकांना पाहिले आणि ते तेथून सिद्धार्थ उद्यानात गेले. तेथे ओळखीचे लोक भेटतात, म्हणून तो तिला घेऊन मिलकॉर्नर येथील एका लॉजमध्ये गेला. लॉजमधील एका रुममध्ये  लग्नाच्या अमिषाने सुनीलने आपल्यावर बलात्कार केला. आणि आता तो लग्नाला नकार देत आहे शिवाय त्याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यास  आत्महत्या करीन अथवा जीवे मारून टाकीन अशी धमकी सुनीलने दिल्याची तक्रार पीडितेने २८ एप्रिल रोजी सिटीचौक ठाण्यात नोंदविली. आपल्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्याचे कळताच त्याने तिच्याशी संपर्क साधून लग्नाची तयारी दर्शविली. सुनील लग्नाला तयार झाल्याचे पाहुन तिनेही बलात्काराची तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शविली.